Agriculture news in marathi The coroner's disturbances Malegaon's sugar factorys Sugarcane sludge | Agrowon

कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप विस्कळीत 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा सव्वालाख टन ऊस एप्रिल महिना उजाडला तरी अद्याप शिवारात उभा आहे. ‘कोरोना’च्या समस्येमुळे विशेषतः बैलगाडी ऊसतोडणी कामगारांनी घराकडे जाण्याचा आग्रह धरल्याने कारखान्याची ऊस गाळप प्रक्रिया पूर्णतः विस्कळीत झाली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन इतकी आहे. परंतु त्या तुलनेत कार्यस्थळावर उसाची उपलब्धता होत नाही. परिणामी प्रशासनाला अलिकडच्या काळात उसाअभावी कारखाना वारंवार बंद ठेवावा लागत आहे. 

माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा सव्वालाख टन ऊस एप्रिल महिना उजाडला तरी अद्याप शिवारात उभा आहे. ‘कोरोना’च्या समस्येमुळे विशेषतः बैलगाडी ऊसतोडणी कामगारांनी घराकडे जाण्याचा आग्रह धरल्याने कारखान्याची ऊस गाळप प्रक्रिया पूर्णतः विस्कळीत झाली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन इतकी आहे. परंतु त्या तुलनेत कार्यस्थळावर उसाची उपलब्धता होत नाही. परिणामी प्रशासनाला अलिकडच्या काळात उसाअभावी कारखाना वारंवार बंद ठेवावा लागत आहे. 

माळेगावने आजवर ८ लाख चाळीस हजार टन गाळप उरकले आहे. अद्याप सभासदांचा सव्वालाख टन ऊस शिवारात शिल्लक असल्याने संबंधित सभासद चिंतेच आहेत. साखर आयुक्तांच्या आदेशान्वये साखर कामगारांसह ऊस तोडणी मजूरांचे आरोग्य व त्यांच्या खाण्यापिण्याची पूर्णतः काळजी घेतली जात आहे. बैलगाडी ऊस तोडणी कामगारांना समजावण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. उर्वरित शिवारातील ऊसाचे गाळप कोणत्याही स्थितीत होण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शिवारात गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही, अशी माहिती अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिली. 

दरम्यान, माळेगाव कारखान्याने यंदाच्या हंगामात (सन २०१९-२०) आजवर ८ लाख ४० हजार ६२० मे.टन उसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये सभासदांचा ४ लाख ७४ हजार, तर गेटकेनधारकांचा ३ लाख ६६ हजार गट ऊस गाळप झाला आहे. त्यानुसार ८ लाख ८३ हजार ४०० साखर पोत्यांची निर्मिती झाली आहे. तसेच रिकव्हरी १०.७४ इतकी मिळाली आहे. 

‘गावी जायची परवानगी द्यावी’ 
आम्हीही माणसे आहोत... ‘कोरोना’ रोग आम्हाला सोडणार आहे का ? आमची लेकरंबाळ गावाकडे उघड्यावर पडली आहेत. आमचे मन तिकडे आणि शरीर येथे आहे. ऊस तोडायला कसे मन तयार होईल... सांगाबर तुम्ही. आम्हाला आमच्या गावाकडे जायला परवानगी दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी तुकाराम गोडाक यांच्यासह बहुतांशी ऊस तोडणी मजूरांनी केली. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...