Agriculture news in marathi, Correct the mistake made by the candidate: Pawar | Agrowon

उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवार

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

सातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. माणसाने आपली चूक झाली, तर तरी कबूल करायची असते. ती चूक आज मी कबूल करतो. त्यांना उमेदवारी देण्याची माझ्या हातून चूक झाली. ती चूक दुरुस्त करण्यासाठी या जिल्ह्यातील घराघरांतील तरुण व वडीलधारी २१ ऑक्‍टोबरची वाट पाहात आहेत. २१ तारखेला आपल्या मनातील निर्णय घेऊन हा जिल्हा श्रीनिवास पाटलांना निवडून देईल,’’ असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.  

सातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. माणसाने आपली चूक झाली, तर तरी कबूल करायची असते. ती चूक आज मी कबूल करतो. त्यांना उमेदवारी देण्याची माझ्या हातून चूक झाली. ती चूक दुरुस्त करण्यासाठी या जिल्ह्यातील घराघरांतील तरुण व वडीलधारी २१ ऑक्‍टोबरची वाट पाहात आहेत. २१ तारखेला आपल्या मनातील निर्णय घेऊन हा जिल्हा श्रीनिवास पाटलांना निवडून देईल,’’ असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.  

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि विधानसभेच्या उमेदवारांसाठी पवार यांच्या उपस्थितीत येथील जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी (ता. १८) सभा झाली. भर पावसात पवार यांना ऐकण्यासाठी हजारो लोकांचा समुदाय उपस्थित होता. कोसळणाऱ्या पावसातच पवार यांनी आपले भाषण केले. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या भाषणात ‘उदयनराजे नकोत,'' असे दहा वर्षे सांगत होतो, असा मुद्दा उपस्थित केला. 

पवार म्हणाले,,‘‘तुमचा निकाल सबंध महाराष्ट्राला सांगणार आहे. सातारा जिल्हा शब्दांचा पक्का, चुकीच्या गोष्टींचे निर्दलन करणारा व छत्रपतींचा विचार खऱ्या अर्थाने जतन करणारा आहे. तुम्ही तो कराल अशीच मला अपेक्षा आहे.’’ त्यांच्या या आवाहनाला जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. 

पवार म्हणाले, "पंतप्रधान साताऱ्यासह अन्य ठिकाणी येऊन गेले. मुख्यमंत्री म्हणताहेत, आमच्याकडे पैलवान आहेत; परंतु समोर पैलवान नाहीत. मला त्यांना सांगायचे आहे, की अनेक उत्तम पैलवान तयार करण्याचे काम या जिल्ह्यातील आमच्या सहकाऱ्यांनी केले. कुस्ती व पैलवान हा भाजपला शोभणारा विषय नाही.’’ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. 


इतर ताज्या घडामोडी
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...
पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
जायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...
नांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
कृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...