`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात गैरव्यवहार

प्रत्येक तालुक्‍यात सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी आठ-नऊ बॅचेस केलेल्या असायच्या. मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षणासाठी सरपंचच गैरहजर राहात होते. त्यामुळे या अभियानाचा म्हणावा तितका उपयोग झाला नाही. याची नीटशी माहितीही सरपंचांपर्यंत पोचविण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचेही यावरून स्पष्ट होते. - मदन दराडे, सदस्य, जिल्हा परिषद, सोलापूर
Corruption in Solapur district in 'Govar-Rubella'
Corruption in Solapur district in 'Govar-Rubella'

सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-रुबेला'' आणि विश्‍वास अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद केली होती. पण, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे तो निधी खर्च केला नाही. त्यामुळे त्या निधीमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? याबाबतची विचारणा करणारा तारांकित प्रश्‍न अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

जिल्हा परिषदेचे सदस्य मदन दराडे यांनी याबाबत तक्रार आरोग्य विभागाकडे केली होती. मात्र, त्यांच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नव्हती. मात्र, आता हा प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित होणार असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. याबाबतची माहिती दोन दिवसांत देण्याच्या सूचना विधिमंडळ सचिवालयाने दिल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या विषयात आर्थिक गैरव्यवहार केला आहे का? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला आहे. 

याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फेब्रुवारी २०१९ मध्ये केली होती. मात्र, त्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही. या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी शासनाने केली आहे का? जर चौकशी केली असेल, तर त्यामध्ये काय आढळून आले आहे? त्यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती विधिमंडळ सचिवालयाने मागितली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com