Agriculture news in marathi Corruption in Solapur district in 'Govar-Rubella' | Page 2 ||| Agrowon

`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात गैरव्यवहार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

प्रत्येक तालुक्‍यात सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी आठ-नऊ बॅचेस केलेल्या असायच्या. मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षणासाठी सरपंचच गैरहजर राहात होते. त्यामुळे या अभियानाचा म्हणावा तितका उपयोग झाला नाही. याची नीटशी माहितीही सरपंचांपर्यंत पोचविण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचेही यावरून स्पष्ट होते.
- मदन दराडे, सदस्य, जिल्हा परिषद, सोलापूर

सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-रुबेला'' आणि विश्‍वास अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद केली होती. पण, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे तो निधी खर्च केला नाही. त्यामुळे त्या निधीमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? याबाबतची विचारणा करणारा तारांकित प्रश्‍न अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

जिल्हा परिषदेचे सदस्य मदन दराडे यांनी याबाबत तक्रार आरोग्य विभागाकडे केली होती. मात्र, त्यांच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नव्हती. मात्र, आता हा प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित होणार असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. याबाबतची माहिती दोन दिवसांत देण्याच्या सूचना विधिमंडळ सचिवालयाने दिल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या विषयात आर्थिक गैरव्यवहार केला आहे का? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला आहे. 

याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फेब्रुवारी २०१९ मध्ये केली होती. मात्र, त्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही. या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी शासनाने केली आहे का? जर चौकशी केली असेल, तर त्यामध्ये काय आढळून आले आहे? त्यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती विधिमंडळ सचिवालयाने मागितली आहे.


इतर ताज्या घडामोडी
पतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवण्याचे आदेशअकोला  ः कोरोना विषाणू संसर्ग...
दिग्रसमध्ये शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला...यवतमाळ  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
सांगलीतील द्राक्ष उत्पादकांचा ओढा...सांगली  : द्राक्षांची वाहतूक सुरु झाली असली...
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर घाऊक सौदे...कोल्हापूर  : येथील बाजार समितीत होणारे सौदे...
आपत्तीतही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘...पुणे  : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये सुरळीत...
कळमना बाजार समितीत व्यवहार ठप्पनागपूर  ः कळमना बाजार समितीत धान्य...
नियंत्रण आंबा फळगळीचेसद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...