राज्यात घेवडा ५०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल

marathi the cost of ghevada is Rs 500 to 4200 per quntal In the State
marathi the cost of ghevada is Rs 500 to 4200 per quntal In the State

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३०) घेवड्याची सुमारे ८ टेम्पो आवक झाली. या वेळी त्यास दहा किलोला १०० ते १२० रुपये दर मिळाला.

घेवड्याची आवक सरासरीपेक्षा कमी असली, तरी मागणी नसल्याने दर कमी राहिले. बाजार समितीमध्ये दररोज सरासरी १० ते १२ टेम्पो घेवड्याची आवक होते. तर, दर सरासरी २५० ते ३०० रुपये असतात. मात्र सध्या मागणी कमी झाल्याने दर कमी असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. बाजारात घेवड्याची आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे.  

गेल्या तीन दिवसांतील आवक (क्विंटल), दर

दिनांक आवक  दर
२९ ३४१ १०००-२०००
२८  २५० १२००-२०००
२७ ४५६ १४००-२५००

नागपुरात १००० ते १२०० रुपये 

नागपूर  : कळमना बाजार समितीत घेवड्याची १५० ते १७० क्विंटलची आवक आहे. घेवड्याला सरासरी १००० ते १२०० रुपयांचा दर असल्याची माहिती व्यापारी सूत्रांंनी दिली.

बाजारात १५ ते १८ रुपये किलोचा किरकोळ दर घेवड्याला मिळत आहे. नागपूर,  वर्धा, अमरावती तसेच लगतच्या भागातील काही गावातून घेवड्याची बाजारात नियमित आवक असल्याचेही सांगण्यात आले. तरीसुद्धा बाजारात येणाऱ्या घेवड्याची आवक मर्यादित असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अकोल्यात १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल 

अकोला येथील बाजारात घेवड्याला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. गुरुवारी (ता.३०) येथील बाजारात या घेवड्याची पाच क्विंटलपर्यंत अधिक आवक झाली. घेवड्याची आवक गेल्या काही दिवसात स्थिर आहे.

विक्री सरासरी १५०० ते २००० दरम्यान झाली आहे. यात चांगला दर्जाचा घेवडा २००० ते २५०० दरम्यान विकला गेला. सरासरी विचार करता घेवडा २००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना घेवडा प्रतिकिलो ४० रुपयांदरम्यान विक्री केला जात आहे. जिल्ह्यात घेवड्याचे क्षेत्र फारसे नाही. त्यामुळे इतर भागातून घेवड्याची आवक या ठिकाणी होत असते. ही आवक फारशी वधारण्याची चिन्हे नाहीत, असे व्यापारी सुत्रांकडून सांगण्यात आले. 

नाशिकमध्ये ५०० ते १५०० रुपये दर

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) घेवड्याची ६२९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. २८) घेवड्याची आवक ५७२ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १०५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी (ता. २७) आवक ५३६ क्विंटल झाली. त्या वेळी ९६० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० होता. 

रविवारी (ता. २६) घेवड्याची आवक ४२० क्विंटल झाली. त्यास १००० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० होता. शनिवारी (ता. २५) आवक ४२० क्विंटल झाली. त्या वेळी १००० ते १५०० रुपये दर मिळाला. 

शुक्रवारी (ता. २४) घेवड्याची आवक ६५१ क्विंटल झाली. त्यास २०० ते १००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६०० होता. गुरुवारी(ता. २३) आवक ४७७ क्विंटल झाली. त्या वेळी ९०० ते १२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १०५० होता. 

मागील आठवड्यापासून बाजार समितीत घेवड्याची आवक कमी जास्त होत आहे. गेल्या तीन दिवसांत आवक वाढली आहे. आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे घेवड्याच्या बाजारभावतही चढ उतार दिसून आला. शुक्रवारी (ता. २४) आवक वाढल्यामुळे दर सर्वात कमी झाल्याचे पहायला मिळाले.

परभणीत १५०० ते २५०० रुपये

परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ३०) घेवड्याची (वाल) १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून, स्थानिक परिसरातील परभणी, जिंतूर तालुक्यातील काही गावांतून घेवड्याची आवक होत आहे. गेल्या महिन्याभरातील प्रत्येक गुरुवारी घेवड्याची ७ ते १५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला सरासरी १५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ३०) घेवड्याची १० क्विंटल आवक झाली. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सांगलीत प्रतिदहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर

सांगली ः ‘‘शिवाजी मंडईत घेवड्याची आवक कमी अधिक आहे. गुरुवारी (ता. ३०) घेवड्याची ३० पोत्यांची (एक पोते ३० किलोचे) आवक झाली आहे. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला,’’ अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंडईत वाळवा, आष्टा, पलुस, मिरज, तुंग, कसबेडिग्रज या परिसरातून घेवड्याची आवक होते. मंगळवारी (ता. २८) घेवड्याची ५० पोत्यांची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस २८० ते ३३० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. २७) घेवड्याची ४० पोत्यांची आवक झाली होती. घेवड्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ३५० रुपये असा दर होता.

रविवारी (ता.२६) घेवड्याची ३५ पोत्यांची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला. शनिवारी (ता. २५) घेवड्याची ४० पोत्यांची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला.

नगरमध्ये १००० ते २००० रूपये प्रतिक्विंटल 

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची ३० क्विंटलची आवक झाली. त्याला प्रतीक्विंटल १००० ते २००० रूपये व सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला साधारण ३० ते ५० क्विंटल घेवड्याची आली होत असते. २३ जानेवारी रोजी १४ क्विंटलची आवक झाली. त्यावेळी १८०० ते ३००० व सरासरी २४०० रुपयांचा दर मिळाला. 

१६ जानेवारी रोजी ३४ क्विंटल ची आवक झाली. त्या दिवशी २००० ते ३००० रूपये व सरासरी २५०० रुपयांचा मिळाला. १० जानेवारी रोजी १७ क्विंटलची आवक होऊन ३००० ते ३५०० रूपये व सरासरी ३२५० रुपयांचा दर मिळाला. ३ जानेवारी रोजी १० क्विंटल आवक होऊन २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपयांचा दर मिळाला. २५ डिसेंबर रोजी ५० क्विंटलची आवक होऊन २००० ते ३००० व सरासरी २५०० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.  

जळगावात २५०० ते ४२०० रुपये 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवड्याची आठवड्यातून दोन - तीन दिवसच आवक होत आहे. गुरुवारी (ता. ३०) तीन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ४२०० रुपये मिळाला. आवक नाशिक, पुणे आदी भागांतून होत आहे. दर मागील चार महिने टिकून असल्याचे सांगण्यात आले. काही अडतदार घेवड्याचा पुरवठा करून घेतात. त्याला मागणी कायम आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com