समृद्धी महामार्गाचा खर्च वाढता वाढे
समृद्धी महामार्गाचा खर्च वाढता वाढे

समृद्धी महामार्गाचा खर्च वाढता वाढे

मुंबई ः फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या खर्चाचा आकडा वाढता वाढतच चालला आहे. सुरुवातीच्या ३६ हजार कोटींवरून अवघ्या दोनच वर्षांत हा आकडा ५५ हजार कोटींच्याही पुढे पोचला आहे.  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना जोडणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तर नागपूर ही राज्याची उपराजधानी असून देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. हे शहरही औद्योगिकदृष्ट्या मोठी गुंतवणूक होऊन औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना समृद्धी महामार्गाने जोडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा संतुलित व समतोल विकास अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. महामार्गाचा विकास आणि बांधणीसाठी ॲन्यूटी आणि लँड पुलिंग मॉडेलचा अवलंब करण्यात येत आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै २०१६ मध्ये या महामार्गाची घोषणा केली. आराखडा तयार झाला तेव्हा या प्रकल्पाचा खर्च ३६ हजार कोटी रुपये इतका होता. भूसंपादन आदी कारणांमुळे प्रकल्पाचा खर्च ३६ हजार कोटींवरून ४६ हजार कोटींवर आणि सहा महिन्यांपर्यंत ४९ हजार कोटी इतका सांगितला जात होता. या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात पुन्हा बदल करत हा संपूर्ण महामार्ग उन्नत पद्धतीचा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली. मात्र आता त्यात पुन्हा सहा ते सात हजार कोटी रुपयांची भर पडली असून हा आकडा आता ५५ हजार कोटींपर्यंत गेल्याचे सांगितले जाते. भूसंपादनातील विरोधामुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास दिरंगाई होत आहे. परिणामी प्रकल्पाच्या खर्चात भरच पडत आहे.  कसा आहे समृद्धी महामार्ग?...

  • मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे अर्थात समृद्धी महामार्ग सुमारे ७१० किलोमीटर लांबीचा महामार्ग
  • या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर १६ तासांऐवजी आठ तासांत होणार पूर्ण
  • १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५४ गावांतून जाणार महामार्ग
  • नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यातून जाणार महामार्ग
  • १६ पॅकेजमध्ये होणार काम  
  • आणखी खर्च वाढण्याची शक्यता ऑक्टोबर २०१७ ला काम सुरू करून २०२० पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याचा शासनाचा मानस होता. प्रत्यक्षात हा महामार्ग बांधून पूर्ण होईपर्यंत प्रकल्प खर्चात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महामार्गासाठी आतापर्यंत बहुतांश भूसंपादन पूर्ण झाल्याचा शासनाचा दावा आहे. एकूण जमिनीपैकी ९० टक्के जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्याचे तर उर्वरीत दहा टक्के जमिनीच्या संपादनाची फक्त तांत्रिक प्रक्रिया शिल्लक असल्याचे सांगण्यात येते.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com