Agriculture news in marathi, Cost of selling cotton Seven rupees per kg | Agrowon

कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलो

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

जळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे. त्यात वेचणीवर आलेला कापूस घरात आणताना मजूरटंचाईचा मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सात रुपये प्रतिकिलो, या दरात कापूस वेचणी शेतकऱ्यांना करून घ्यावी लागत आहे. 

जळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे. त्यात वेचणीवर आलेला कापूस घरात आणताना मजूरटंचाईचा मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सात रुपये प्रतिकिलो, या दरात कापूस वेचणी शेतकऱ्यांना करून घ्यावी लागत आहे. 

मजूर मिळत नसल्याने इतर गावांमधून मजूर आणावे लागत आहेत. त्यासाठी वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे. जळगाव, चोपडा, जामनेर, धरणगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा, भडगाव, यावल, रावेर, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा आदी सर्वच भागात मजूरटंचाई आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे उमलली आहेत. एकाच वेळी वेचणी सर्वत्र सुरू आहे. शिवारात कापसाखालील क्षेत्र आहे.

एकाच वेळी सर्वत्र वेचणी सुरू झाल्याने मजुरांची गरजही वाढली आहे. क्षेत्र वेचणीला अधिक व मजूर कमी अशी स्थिती सर्वत्र आहे. यामुळे मजुरीचे दरही वाढले आहेत. 

शेतकरी वेचणीला आलेला कापूस बेमोसमी पाऊस व इतर समस्यांमुळे शेतात नुकसान होऊन हातचा जाईल, या भीतीने मिळतील, त्या भागातून मजूर आणून वेचणी करून घेत आहेत. यात कापूस वेचणीचा खर्च वाढला आहे. वेचणीचा खर्च पाच रुपये प्रतिकिलोवरून सात रुपये प्रतिकिलो, असा झाला आहे. तर मजुरी १२५ वरून १५० ते १८० रुपये रोज झाली आहे. सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत कामासाठी २०० रुपये द्यावा लागत आहेत. किमान ७०० रुपये मजुरी एक क्विंटल कापूस घरात आणण्यासाठी द्यावी लागत आहे. 

कापूस वेचणीसाठी ‘रोहयो’ राबवा

कापसाचे मध्यंतरी अतिपावसात मोठे नुकसान झाले आहे. असा दुहेरी समस्यांचा सामना यंदा कापूस उत्पादक करीत आहेत. रोजगार हमी योजना तात्पुरत्या स्वरूपात कापूस वेचणीच्या कामासाठी खानदेशात राबवावी, अशी मागणीदेखील पुढे येत आहे. शेतकरी निम्मा खर्च करतील व शासनाने निम्मा खर्च करावा, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...