नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६०० ते २३,५०० रुपये

नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६०० ते २३,५०० रुपये
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६०० ते २३,५०० रुपये

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात कोथिंबिरीची आवक ५३२१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९६०० ते २३५०० असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी; तर काहींची आवाक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त निघाले. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली; तसेच परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. हिरव्या मिरचीची आवक ४३१६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ५०००  ते ६०००; तर ज्वाला मिरचीला ४००० ते ५५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. परपेठेत मागणी वाढल्याने मिरचीच्या बाजारभावात वाढ झाली. वालपापडी घेवड्याची आवक ८९५ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ५५०० ते ७००० दर मिळाला. घेवड्याला ३०००  ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. या सप्ताहात वाळपापडी घेवड्याची आवक वाढली. गाजराची आवक ६१० क्विंटल झाली. त्यास २३४० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आवक १२०५७ क्विंटल झाली. बाजारभाव ६०० ते १५०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक ७४८१ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १२००  प्रतिक्विंटल होते. लसणाची आवक १९१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ११५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भुईमुगाच्या शेंगांची आवक १०५८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २३५० ते ३५०० असा दर मिळाला. 

टोमॅटोला ३०० ते ६००, वांगी २५० ते ५००, फ्लॉवर १०० ते २०० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. कोबीला १५० ते २५० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची २०० ते ३५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा १२५ ते ३५०, कारले ४०० ते ६५०, गिलके ३०० ते ५००, भेंडी २०० ते ४२५ असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला ३०० ते ४५०, लिंबू २७५ ते ६४०, दोडका ५०० ते ८०० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथी ३६०० ते ९०००, शेपू ११०० ते ३२००, कांदापात १५६० ते ३२००, पालक २०० ते ३९०, पुदिना १७० ते २४० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ६८९८ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ३२५० व मृदुला वाणास ५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

आंब्याची आवक ८२३ क्विंटल झाली. दशहरी ३००० ते ४५०० प्रतिक्विंटल; तर नीलम आंब्यास १८०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजाची आवक ४० क्विंटल झाली. बाजारभाव ४०० ते ८०० प्रतिक्विंटल मिळाला असून आवक कमी झाली. मोसंबीची आवक ९५ क्विंटल झाली. बाजारभाव २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक २१० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com