agriculture news in marathi Cotton from ‘Panan’ in Nanded Purchase of 26,000 quintals | Agrowon

नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार क्विंटल खरेदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 डिसेंबर 2020

नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी (सीसीआय) कापूस खरेदी होत आहे.

नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी (सीसीआय) कापूस खरेदी होत आहे. जिल्ह्यात पणनकडून भोकर व तामसा (ता. हदगाव) या दोन खरेदी केंद्रांवर चार कॉटन मिलवर सध्या २६ हजार ६१ क्विंटल खरेदी झाली, अशी माहिती पणनच्या विभागीय कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यात सध्या ‘सीसीआय’साठी दोन यंत्रणांकडून कापूस खरेदी सुरु आहे. यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून भोकर येथील मंजित कॉटन व व्यंकटेश्वरा जिनींग या दोन ठिकाणी खरेदी सुरु आहे. या ठिकाणी २१ हजार ७११ क्विंटल कापसाची खरेदी झाली. तर, तामसा (ता. हदगाव) येथील बालाजी कॉटनस्पीन व नटराज कॉटन प्रायवेट लिमिटेड या दोन ठिकाणी चार हजार ३५० क्विंटल अशा एकूण २६ हजार ६१ क्विंटल कापसाची खरेदी झाली. 

खरेदी केंद्रांवर केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार खरेदी होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कटी घेतली जात नाही. नियमानुसार आद्रता तपासली जात असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दाभड व कलदगाव (ता. अर्धापूर) व तसेच नायगाव येथे खरेदी सुरु आहे. या दोन केंद्रांवर १३ हजार ३३२ क्विंटल कपाशीची खरेदी झाली.


इतर ताज्या घडामोडी
ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे...अमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नामकरणाला विरोधनागपूर ः नागपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या...
औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळपऔरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
वीज तोडल्यास गाठ आमच्याशी : कृती समितीकोल्हापूर ः कोरोना काळातील वीजबिले माफ करण्याची...
बीटी कापूस बियाण्यातील शेतकऱ्यांची...बुलडाणा ः कापूस उत्पादकांना कमी खर्चात अधिक...
अण्णांचे दिल्लीऐवजी राळेगणसिद्धीत आंदोलननगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरा...सोलापूर ः हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील...
गावठाण भूमापन कामाचे ड्रोनद्वारे...नांदेड : ‘‘भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण...
जमिनींचा लिलाव रोखा ; शेतकरी संघटनेची...नाशिक : शेतकऱ्यांचे चोहोबाजूंनी नुकसान झाले आहे....
सातारा जिल्ह्याची वीजबिल थकबाकी ४४...नगर ः खरीप हंगामात तयार झालेल्या तुरीला बाजारात...
शाश्‍वत उत्पन्नासाठी वनशेतीचे नियोजनवनशेतीपासून अन्नधान्याबरोबरच वृक्षापासून चारा,...
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
असे करा कोबीवर्गीय पिकांतील किडींचे...कोबीवर्गीय भाजीपाला पानकोबी व फुलकोबीवर मावा,...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...