नगर जिल्ह्यात ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी

नगर ः यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने कापसाची लागवड झपाट्याने उरकली जात आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात सुमारे ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणे सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे.
Cotton on 91 thousand hectare area in Nagar district
Cotton on 91 thousand hectare area in Nagar district

नगर ः यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने कापसाची लागवड झपाट्याने उरकली जात आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात सुमारे ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणे सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे यंदा पंधरा जुलैपर्यंत लागवड उरकण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यात क्षेत्र अधिक असून इतर तालुक्यांतही कापसाचे क्षेत्र कायम आहे. नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील शेवगाव, पाथर्डी, जामखेड, नेवासा तालुक्यात कापसाचे सर्वाधिक क्षेत्र असते. गेल्या वर्षी कापसाचे एक लाख ५ हजार ४२७ हेक्टर सरासरी क्षेत्र होते. तर एक लाख ३० हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यामुळे या वर्षी कृषी विभागाने सरासरी क्षेत्रात वाढ करून ते १ लाख १४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्र केले.

यंदा सुरुवातीलाच आणि चांगला पाऊस झाल्याने कापसाच्या लागवडीला वेग आला. त्यामुळे यंदा जून अखेरपर्यंतच ८० टक्के म्हणजे ९० हजार ८६३ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने अजून पंधरा दिवसांत कापसाची लागवड उरकणार असल्याचे दिसत आहे.

उगवण चांगली नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड तालुक्यासह शेजारच्या मराठवाड्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. लागवडीनंतर पावसाने दडी मारल्यावर उगवणीवर परिणाम होत असल्याचा आत्तापर्यंत अनेक वेळचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यंदा मात्र लागवडीनंतरही सतत पाऊस होत असल्याने उगवण चांगली झाली आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनालाही चांगला फायदा होईल, असे जाणकारांचे मत आहे.

आत्तापर्यंत झालेली कापूस लागवड (हेक्टर)
नगर १५०६
पारनेर २२
श्रीगोंदा १३८५
कर्जत ३२३९
जामखेड २७६३
शेवगाव ३२८७०
पाथर्डी २३०३०
नेवासा १४७०२
राहुरी ५८६३
संगमनेर २११
अकोले
कोपरगाव २०९८
श्रीरामपूर २६९९
राहाता ४७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com