Agriculture news in Marathi Cotton on 91 thousand hectare area in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

नगर ः यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने कापसाची लागवड झपाट्याने उरकली जात आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात सुमारे ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणे सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे.

नगर ः यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने कापसाची लागवड झपाट्याने उरकली जात आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात सुमारे ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणे सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे यंदा पंधरा जुलैपर्यंत लागवड उरकण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यात क्षेत्र अधिक असून इतर तालुक्यांतही कापसाचे क्षेत्र कायम आहे. नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील शेवगाव, पाथर्डी, जामखेड, नेवासा तालुक्यात कापसाचे सर्वाधिक क्षेत्र असते. गेल्या वर्षी कापसाचे एक लाख ५ हजार ४२७ हेक्टर सरासरी क्षेत्र होते. तर एक लाख ३० हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यामुळे या वर्षी कृषी विभागाने सरासरी क्षेत्रात वाढ करून ते १ लाख १४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्र केले.

यंदा सुरुवातीलाच आणि चांगला पाऊस झाल्याने कापसाच्या लागवडीला वेग आला. त्यामुळे यंदा जून अखेरपर्यंतच ८० टक्के म्हणजे ९० हजार ८६३ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने अजून पंधरा दिवसांत कापसाची लागवड उरकणार असल्याचे दिसत आहे.

उगवण चांगली
नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड तालुक्यासह शेजारच्या मराठवाड्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. लागवडीनंतर पावसाने दडी मारल्यावर उगवणीवर परिणाम होत असल्याचा आत्तापर्यंत अनेक वेळचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यंदा मात्र लागवडीनंतरही सतत पाऊस होत असल्याने उगवण चांगली झाली आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनालाही चांगला फायदा होईल, असे जाणकारांचे मत आहे.

आत्तापर्यंत झालेली कापूस लागवड (हेक्टर)
नगर १५०६
पारनेर २२
श्रीगोंदा १३८५
कर्जत ३२३९
जामखेड २७६३
शेवगाव ३२८७०
पाथर्डी २३०३०
नेवासा १४७०२
राहुरी ५८६३
संगमनेर २११
अकोले
कोपरगाव २०९८
श्रीरामपूर २६९९
राहाता ४७५

 


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...