agriculture news in Marathi, cotton affected by root rot in Akolkhed and amboda, Maharashtra | Agrowon

अकोलखेड-अंबोडामधील कपाशी ‘मूळकूज’ने बाधित

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 ऑगस्ट 2018

अकोला ः अकोट तालुक्यातील अकोलखेड-अंबोडा शिवारात कपाशी वाळत असल्याचा प्रकार समोर अाल्यानंतर मंगळवारी (ता. ७) कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. हा प्रकार प्रामुख्याने मूळकूज झाल्याने होत असल्याचा अहवाल देण्यात अाला अाहे.

अकोला ः अकोट तालुक्यातील अकोलखेड-अंबोडा शिवारात कपाशी वाळत असल्याचा प्रकार समोर अाल्यानंतर मंगळवारी (ता. ७) कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. हा प्रकार प्रामुख्याने मूळकूज झाल्याने होत असल्याचा अहवाल देण्यात अाला अाहे.

जुलै महिन्यात पडलेला पाऊस थांबताच अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आकोलखेड-आंबोडा शिवारातील कपाशीचे उभे पीक सुकणे, झाडे वाळून जाणे असे प्रकार समोर अाले अाहेत. अनेकांच्या कापूस पिकात ही समस्या उद्भवली असून, शेतकरी हवालदिल झाले अाहेत. घनश्याम बिजणे, कैलास पाटील, नारायण बायवार, सुभाष बिजणे, विष्णू धुवे, गजानन बायवार, नारायण मुंडोकार, अशोक धुवे, देविदास जांभळे, गजानन सावरकर, रितेश जांभळे, धनंजय देशमुख, विनय देशपांडे यांच्यासह इतरांच्या शेतातील कपाशीचे पीक सुकले. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देत नुकसानभरपाईची मागणीही करण्यात अाली.  

याबाबत पाहणीसाठी मंगळवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कापूस) डॉ. टी. एस. राठोड, सहायक कापूस पैदासकार डॉ. एस. बी. देशमुख, सहायक वनस्पती रोग (विकृती) शास्त्रज्ञ डाॅ. व्ही. व्ही. देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, तालुकाकृषी अधिकारी के. अार. पांडे यांनी अकोलखेड, अंबोडा शिवारात शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. 

अकोलखेड येथील अरुणा किशोर निचळ यांच्या शेतात कपाशीचा बीटी वाण लावण्यात अालेला अाहे. या शेतात ३५ ते ४० टक्के कपाशीची झाडे मूळकुजीमुळे (रूट रॉट) बाधित झालेली दिसली. 

अंबोडा गावातील पुरुषोत्तम डोहळे यांच्या १.६६ हेक्टर क्षेत्रावर बीजी टू वाण लावण्यात आलेला अाहे. त्यात ४० ते ४५ टक्के मूळकूज अाढळली. घनश्याम बिजणे यांच्या शेतात १० एकरांत कपाशीची लागवड केलेली असून, यातील पाच एकरांतील कपाशी ८५ ते ९० टक्के मूळकुजीने प्रभावित झालेली असल्याचे समितीच्या निदर्शनास अाले.

असे सांगितले उपाय

  • शेतात हेक्टरी दीड ते दोन किलो या प्रमाणात ट्रायकोडर्माची अाळवणी 
  • कॉपर अाॅक्सिक्लोराईड ३० ग्रॅम तसेच स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात टाकून अर्धा लिटर प्रतिझाड अाळवणी (ड्रेंचीग) करणे

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...