वणी तालुक्‍यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  ः कापसाच्या दरात आलेल्या तेजीमुळे वणी तालुक्‍यात या वर्षी कापसाखालील क्षेत्रात पाच टक्‍के वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

वणी तालुक्‍यांतर्गत १६२ गावे असून, तालुक्‍याचे भौगोलिक क्षेत्र ९२ हजार ३५८ हेक्‍टर आहे. त्यापैकी पिकाखाली येणारे क्षेत्र ४ हजार ४२५ हेक्‍टर आहे. तालुक्‍यात खरीप हंगामात ६४ हजार ३० हेक्‍टरवर तर रब्बी हंगामात तीन हजार ८२० हेक्‍टरवर पिकांची लागवड होते. उन्हाळी हंगामात ४३० हेक्‍टरवर विविध पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. तालुक्‍यात सोयाबीन, तूर व कापूस ही मुख्य पिके आहेत. त्यातही शेतकऱ्यांचा कापूस लागवडीवर अधिक भर राहतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून गुलाबी बोंडअळीने शेतकरी त्रस्त आहेत. त्याचा कापूस उत्पादनावरही परिणाम झाला.

२०१८-१९ या वर्षात कृषी विभागाने केलेली जागृती आणि शिफारशीत उपाययोजनांची अंमलबजावणी यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव काही अंशी नियंत्रणात आला. परंतू यावर्षीच्या हंगामाला कमी पावसाचा फटका बसला. कापूस उत्पादन कमी झाल्याने दरात तेजी आली. वणी बाजारपेठेत कपाशीला उच्चांकी ६५०० रुपये क्‍विंटलचा भाव मिळाला. काही जिल्ह्यांमध्ये पावणेसात हजारांपर्यंत कपाशीचे दर होते. या वर्षीदेखील कापसाचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तालुक्‍यात कापसाखालील क्षेत्र वाढीची अपेक्षा कृषी विभागाला आहे. २०१८-१९ या हंगामात शेतकऱ्यांचा ४३ हजार ९२५ हेक्‍टरवर कपाशीचा पेरा होता. या वर्षी हे क्षेत्र ४४ हजार ७५० हेक्‍टरवर पोचण्याची शक्‍यता आहे. भाजीपाला लागवड क्षेत्रातही वाढीचा अंदाज वणी तालुका कृषी अधिकारी आनंद बदलख यांनी व्यक्‍त केला.     

असे आहे पिकाखालील प्रस्तावित क्षेत्र (हेक्‍टर)
कापूस   ४४,७५०
सोयाबीन ८८४० 
तूर ९६४५
ज्वारी १००
मूग  २५
उडीद १०
भाजीपाला ३६०
मका ५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com