agriculture news in marathi Cotton area in Parbhani likely to decline | Page 3 ||| Agrowon

परभणीत कपाशी क्षेत्र घटण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

परभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. यंदा २ लाख हेक्टरवर लागवड नियोजित आहे.

परभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. यंदा २ लाख हेक्टरवर लागवड नियोजित आहे. शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणे पुरवठा करण्यासाठी कृषी विभागातर्फे बीटी कपाशी बियाण्याच्या ११ लाख पाकिटांची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे,’’ अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.

खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९०० हेक्टर  आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे गेल्या काही वर्षात शेतकरी सोयाबीन या पर्यायी नगदी पीकांकडे वळले आहेत. परंतु त्यामुळे जिल्ह्यातील कपाशीच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली आहे. गतवर्षी (२०२०) सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे २ लाख ३७ हजार ९७८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. 

जिल्ह्यातील नऊ पैकी परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा या पाच सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक तर सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ या चार तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी लागवड झाली होती. यंदा सर्वच तालुक्यातील कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात यंदा ३७ हजार ९७८ हेक्टरने घट येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात २०१९-२० मध्ये बीटी कपाशी बियाण्याच्या ८ लाख १ हजार ९ पाकिटांचा, तर २०२०-२१ मध्ये १० लाख ३ हजार ४९४ पाकिटांचा पुरवठा करण्यात आला. यंदासाठी विविध कंपन्यांकडे ११ लाख बियाणे  पाकिटांची मागणी करण्यात आली.

अजित १५५, अजित १९९, अंकुर ३०२८ या वाणांची प्रत्येकी २५ हजार पाकिटे, ‘नुजिविडू’च्या मल्लिका, ‘भक्ती’, ‘अंकुर’ ‘जय’ या वाणांची प्रत्येकी ३० हजार पाकिटे, ‘नुजिविडू’च्या  ‘राजा’, ‘ग्रीन गोल्ड’च्या ‘विठ्ठल’ या वाणांची प्रत्येकी ४० हजार पाकिटे, महिको डॉ. ब्रेंट वाणाची १३ हजार, अजित १११ वाणाची २ हजार, ‘नुजिविडू’च्या ‘बलवान’ वाणाची ५ हजार, महिकोच्या ७३५१ वाणांची ७ हजार ५०० पाकिटे, मॉन्सॅन्टोच्या ‘ब्रम्हा’ वाणांची ८ हजार, ‘राशी’च्या ६५९ वाणांची १ लाख ४० हजार पाकिटे तसेच ७७९ वाणाची ५२ हजार ५०० पाकिटे,  ‘कावेरी’च्या ‘जादू’ वाणाची २ लाख ५ हजार पाकिटांचा, इतर सर्व वाणांच्या ४ लाख २२ हजार पाकिटांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...