बाजारात कापसाची आवक कमी

कापूस
कापूस

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामामध्ये शनिवार (ता. २)पर्यंत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापारी यांची मिळून एकूण ९ लाख ७५ हजार ८७३ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. दुष्काळी स्थिती तसेच बोंड अळीमुळे विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील कापूस उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजार समित्यांतील कापूस खरेदी यंदा कमीच आहे. खुल्या बाजारातील दर हमीदरापेक्षा जास्त असल्यामुळे कापूस उत्पादक पणन महासंघाच्या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. नांदेड जिल्ह्यांमध्ये भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ची यंदा कुंटूर, नायगाव, धर्माबाद, कलटगाव या ५ ठिकाणी खरेदी केंद्रे मंजूर होती. सीसीआयची एकूण ५ हजार ७३५ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआयच्या कलटगाव केंद्रावर ३ हजार २८१ क्विंटल, धर्माबाद केंद्रावर ५४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.  खासगी व्यापाऱ्यातर्फे नांदेड येथे ११ हजार ४२५ क्विंटल, कुंटूर येथे १० हजार ३७३ क्विंटल, धर्माबाद येथे १ लाख २ हजार ५९८ क्विंटल, भोकर येथे १ लाख ३४ हजार ७१२  क्विंटल, हदगाव येथे १० हजार ३१५ क्विंटल, किनवट येथे १५ हजार ४२५ क्विंटल खरेदी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून एकूण २ लाख ७९ हजार १२३ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआय आणि खासगी व्यापाऱ्यांची मिळून एकूण २ लाख ८४ हजार ८५८ क्विंटल कापूस खरेदी झाली. कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते ५ हजार ५५० रुपये दर मिळाले. परभणी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शनिवार (ता. २) पर्यंत एकूण ६ लाख ४३ हजार ४२९ क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) १२ हजार २३५ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयकडून प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ४५० रुपये दर मिळाले. खासगी व्यापाऱ्यांकडून ६ लाख ३१ हजार १९४ क्विंटल कापूस खरेदी झाली असून, प्रतिक्विंटल ५ हजार ३५० ते ५ हजार ६५० रुपये दर मिळाले.  हिंगोली जिल्ह्यातील ७  कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण ४७ हजार ५८६ क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये भारतीय कापूस महामंडळातर्फे (सीसीआय) २३ हजार ५४८ क्विंटल कापूस खरेदी झाली. प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ३५० रुपये दर मिळाला. खासगी व्यापाऱ्यांकडून २४ हजार ३८ क्विंटल कापूस खरेदी झाली असून, प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार   ३५० रुपये दर मिळाला, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हानिहाय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये) २,८४,८५८ नांदेड ६,४३,४२९ परभणी ४७,५८६ हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com