भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
जळगावात कापसाच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षा
जळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची विक्री शासकीय खरेदी केंद्रात केली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना कापसाची विक्री करून एक महिना झाला, तरीदेखील चुकारे प्राप्त झालेले नसल्याची स्थिती आहे.
जळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची विक्री शासकीय खरेदी केंद्रात केली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना कापसाची विक्री करून एक महिना झाला, तरीदेखील चुकारे प्राप्त झालेले नसल्याची स्थिती आहे.
पणन महासंघाने जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, धरणगाव, भडगाव येथे कापसाची खरेदी केली. तर कापूस महामंडळाने (सीसीआय) जळगाव, चोपडा, भुसावळ, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, बोदवड येथे कापूस खरेदी केली. सुमारे २५ लाख क्विंटल कापसाची खरेदी या संस्थांनी गेल्या आठवड्यापर्यंत केली आहे. यातील सुमारे सात लाख क्विंटल कापसासंबंधीचे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
सीसीआयच्या केंद्रात कापूस विक्री करून २० दिवस झाले तरीदेखील अनेकांना चुकारे प्राप्त झाले नाहीत. तर पणन महासंघाच्या केंद्रात कापसाची विक्री करून एक महिना झाला तरीदेखील चुकारे प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, भीती आहे. शेतकरी निधी किंवा चुकाऱ्यांच्या चौकशीसाठी बँका, खरेदी केंद्रात जात आहेत. परंतु शेतकऱ्यांना सुट्ट्या, बँकांमधील कोरोनाच्या समस्येने आलेल्या अडचणी, बिले वितरणातील विलंब आदी कारणे सांगितली जात आहेत.
अनेक केंद्रांमध्ये खरेदीनंतर बिलांवर केंद्रप्रमुखांच्या सहीला विलंब झाल्याचेदेखील सांगितले जात आहे. यात शेतकऱ्यांना निधीसाठी प्रतीक्षा करावी लागते. कापूस विक्रीनंतर शेतकऱ्यांना पावती दिली जाते. परंतु ही पावती फक्त शोभेलाच आहे. सर्व कामकाज ऑफलाईन असल्याची स्थिती आहे.
शेतकऱ्यांना मनस्ताप
याबाबत शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार यांच्यापर्यंत माहिती पोचविली आहे. यावर मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधावा लागत आहे. वरिष्ठदेखील कनिष्ठ कार्यालयात संपर्क साधा, असे सांगून संपर्क बंद करतात. यात शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात असल्याची स्थिती आहे.
- 1 of 1059
- ››