मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असू
बातम्या
परभणीत कापसाचे चुकारे चार हजारांवर शेतकऱ्यांना अदा
परभणी ः ‘‘४ हजार ३५३ शेतकऱ्यांना ९२ कोटी १६ लाख ४४ हजार २४६ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले,’’ अशी माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेणके यांनी दिली.
परभणी ः ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे जिल्ह्यातील ५ केंद्रांवर १० हजार ९१२ शेतकऱ्यांचा ३ लाख ४२ हजार ३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. आजवर तीन केंद्रांवरील ४ हजार ३५३ शेतकऱ्यांना ९२ कोटी १६ लाख ४४ हजार २४६ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले,’’ अशी माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेणके यांनी दिली.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदराने पणन महासंघातर्फे जिल्ह्यातील परभणी, पाथरी, गंगाखेड येथील बाजार समित्याअंतर्गंत पहिल्या टप्प्यात, तर सोनपेठ आणि पालम बाजार समित्याअंतर्गंत त्यानंतरच्या टप्प्यात खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली. डिसेंबर अखेरपर्यंत परभणी केंद्रावरील तीन जिनिंग कारखान्यामध्ये कापूस विक्री केलेल्या १ हजार १२३ शेतकऱ्यांना १७ कोटी ९८ लाख ३४ हजार ५२२ रुपयांचे चुकारेअदा करण्यात आले.
पाथरी येथील एका जिनिंग कारखान्यात कापूस विक्री केलेल्या ४२६ शेतकऱ्यांना ६ कोटी ५४ लाख ४५ हजार ३२८ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. गंगाखेड केंद्रावरील ५ जिनिंग कारखान्यात कापूस विक्री केलेल्या २ हजार ८० शेतकऱ्यांना ६७ कोटी ६३ लाख ६४ हजार ३९६ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले.
शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.