शेतकरी संघटनेचे अडगावमध्ये कापूस जाळा आंदोलन 

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी अकोट, तेल्हारा तालुका शेतकरी संघटनेतर्फे अडगाव येथे कापूस जाळा आंदोलन करण्यात आले.
akola agitation
akola agitation

अकोला ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी अकोट, तेल्हारा तालुका शेतकरी संघटनेतर्फे अडगाव येथे कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. अकोट -तेल्हाराच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (ता.२२) दुपारी हे आंदोलन झाले.  या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, शेतकरी संघटना युवा आघाडी दिनेश देऊळकार, कुशल राऊत, दिनेश गिर्हे, आकाश देऊळकार, बाळू बोदडे, प्रल्हाद भोपळे, गणेश इंगळे, अनिल सिरसागर, विश्वनाथ रेळे, शरद उमाळे, विशाल निमकर्डे, शाम राऊत, ऋषिकेश निमकर्डे व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.  राज्यात व जिल्ह्यातही सीसीआयची कापूस खरेदी संथगतिने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. पेरणीचा हंगाम समोर आलेला आहे. शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे. नेहमीप्रमाणे शासकीय खरेदी संथ गतीने सुरू आहे. सीसीआय फक्त लांब धाग्याचा कापूस विकत घेत आहे. खुल्या बाजारपेठेत कापसाला मागणी नाही. त्यामुळे शासनाने लांब, मध्यम व अरुंद धाग्याचा कापूस खरेदी करावा. गुणवत्तेसाठी ग्रेडर नेमलेला आहे. परंतु बहुतेक ठिकाणी कापसाच्या गुणवत्तेमध्ये जीनमालक हस्तक्षेप करत असल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण झालेली आहे.  एकीकडे शासनाचे धोरण फक्त लांब धाग्याचा कापूस खरेदी करण्याचे तर दुसरीकडे कोणतेही अधिकृत अधिकार नसताना जिनिग मालकाचा कापसाच्या गुणवत्तेत हस्तक्षेप यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत अडकलेला आहे. शासकीय धोरणाचा निषेध व जिनिंग मालाकाचा हस्तक्षेप यांचा निषेध नोंदवित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कापूस जाळा आंदोलन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com