agriculture news in Marathi cotton burn agitation in Adgaon Maharashtra | Page 3 ||| Agrowon

शेतकरी संघटनेचे अडगावमध्ये कापूस जाळा आंदोलन 

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी अकोट, तेल्हारा तालुका शेतकरी संघटनेतर्फे अडगाव येथे कापूस जाळा आंदोलन करण्यात आले.

अकोला ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी अकोट, तेल्हारा तालुका शेतकरी संघटनेतर्फे अडगाव येथे कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. अकोट -तेल्हाराच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (ता.२२) दुपारी हे आंदोलन झाले. 

या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, शेतकरी संघटना युवा आघाडी दिनेश देऊळकार, कुशल राऊत, दिनेश गिर्हे, आकाश देऊळकार, बाळू बोदडे, प्रल्हाद भोपळे, गणेश इंगळे, अनिल सिरसागर, विश्वनाथ रेळे, शरद उमाळे, विशाल निमकर्डे, शाम राऊत, ऋषिकेश निमकर्डे व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. 

राज्यात व जिल्ह्यातही सीसीआयची कापूस खरेदी संथगतिने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. पेरणीचा हंगाम समोर आलेला आहे. शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे. नेहमीप्रमाणे शासकीय खरेदी संथ गतीने सुरू आहे. सीसीआय फक्त लांब धाग्याचा कापूस विकत घेत आहे. खुल्या बाजारपेठेत कापसाला मागणी नाही. त्यामुळे शासनाने लांब, मध्यम व अरुंद धाग्याचा कापूस खरेदी करावा. गुणवत्तेसाठी ग्रेडर नेमलेला आहे. परंतु बहुतेक ठिकाणी कापसाच्या गुणवत्तेमध्ये जीनमालक हस्तक्षेप करत असल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण झालेली आहे. 

एकीकडे शासनाचे धोरण फक्त लांब धाग्याचा कापूस खरेदी करण्याचे तर दुसरीकडे कोणतेही अधिकृत अधिकार नसताना जिनिग मालकाचा कापसाच्या गुणवत्तेत हस्तक्षेप यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत अडकलेला आहे. शासकीय धोरणाचा निषेध व जिनिंग मालाकाचा हस्तक्षेप यांचा निषेध नोंदवित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कापूस जाळा आंदोलन केले. 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम;...रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर सांगली  : जिल्ह्यात बुधवार (ता. ८)...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९...परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे...
दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र...रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
रताळे लागवडीसाठी सुधारित जातीरताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
टप्प्याटप्प्याने करतो डाळिंब बहराचे...शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब शेतकरी ः ज्ञानेश्वर...
कृषी हवामान सल्‍ला (मराठवाडा विभाग)भारतीय हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार,...
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...