Agriculture news in marathi Cotton buying may start in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

अकोला ः लॉकडाऊनमध्ये शासनाने काही बाबींना शिथिलता दिली असून कापूस खरेदीचेही आदेश दिले आहेत. मात्र, मार्चमध्ये बंद झालेली ही कापूस खरेदी आता पूर्ववत करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत खरेदी सुरू होईल, असे पणनच्या सूत्रांनी सांगितले. 

अकोला ः लॉकडाऊनमध्ये शासनाने काही बाबींना शिथिलता दिली असून कापूस खरेदीचेही आदेश दिले आहेत. मात्र, मार्चमध्ये बंद झालेली ही कापूस खरेदी आता पूर्ववत करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत खरेदी सुरू होईल, असे पणनच्या सूत्रांनी सांगितले. 

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच कापूस पणन महामंडळाची कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. आता ही खरेदी पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पणन महासंघामार्फत अकोल्यात बोरगाव मंजू, कानशिवणी, तेल्हारा तर वाशीम जिल्ह्यात मानोरा, कारंजा येथे केंद्र सुरू केले जाणार आहेत. 

येथे कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही नोंदणी करताना यावर्षाच्या कापसाची नोंद असलेला सातबारा, शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक नोंदणी करावा लागणार आहे. आता सोशल डिस्टन्सिंग पाळत दिवसाला १५ ते २० गाड्यांची आवक केली जाईल. चारशे ते पाचशे क्विंटल कापसाचे मोजमाप करण्यात येईल. 

यासाठी शेतकऱ्यांना मोबाईलवर मॅसेज दिला जाणार असून त्याने कुठल्या वेळेत व कोणत्या दिवशी कापूस विकायला आणावा याची माहिती असेल, असेही अधिकाऱ्याने सांगितले. शासनाकडून एफएक्यू दर्जाचाच कापूस खरेदी केला जाणार आहे. आताची खरेदी बंद होण्यापूर्वी पणन महासंघाने या भागातील आपल्या केंद्रावर एक लाख ४६ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. 

शासनाच्या खरेदी केंद्रांवर केवळ एफएक्यू दर्जाचा कापूस घेतला जाणार आहे. यंदा पावसामुळे बराच कापूस दुय्यम दर्जाचा झालेला आहे. हा कापूस कुठे विकायचा, असा पेच तयार झाला आहे. माझ्या सारखे असंख्य शेतकरी सध्या या चिंतेने ग्रस्त झालेले आहेत. शासन हा कापूस घेणार नाही आणि खासगी खरेदीही बंद आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने यावर तोडगा काढायला हवा. 
- गणेश नानोटे, कापूस उत्पादक शेतकरी, निंभारा, जि. अकोला. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...