agriculture news in Marathi, cotton crop affected by rain, Maharashtra | Agrowon

पूर्वहंगामी कापूस पिकाला पावसाचा फटका
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पूर्वहंगामी कापूस पिकाला कमी पर्जन्यमान आवश्‍यक असते. काळ्या कसदार किंवा कुठल्याही क्षेत्रात अधिक पाऊस झाला तर बोंडे, कैऱ्यांचे नुकसान होते. यंदा असे नुकसान अधिक दिसत आहे. तसेच कैऱ्याही कमी लगडत आहेत. 
- दीपक पाटील, कापूस उत्पादक, माचले (जि. जळगाव)

जळगाव ः खानदेशातील पूर्वहंगामी कापूस पिकाला सततचा पाऊस आणि प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला असून, बोंडे काळवंडली आहेत. उत्पादनात आजघडीला १५ ते २० टक्के घट मानली जात आहे.
 

पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा व धुळे, नंदुरबारमधील शहादा व तळोदा आणि जळगावमधील तापी काठावरील यावल, चोपडा, जळगाव, अमळनेर, गिरणाकाठावरील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि वाघूरच्या क्षेत्रातील जामनेर तालुका प्रसिद्ध आहे. यंदा खानदेशात मिळून सुमारे दीड लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली आहे. सर्वाधिक सुमारे ८० हजार हेक्‍टर लागवड जळगाव जिल्ह्यात आहे. 

तापी, गिरणा, पांझरा, गोमाई, सुसरी नदीकाठच्या भागातील काळ्या कसदार जमिनीत पीक जोमात होते. परंतु शहादा, तळोदा, चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, जामनेर आदी भागांत सततचा पाऊस व कोरड्या वातावरणाचा अभाव यामुळे पिकातील बोंडे काळवंडली आहेत. काही शेतांमध्ये सखल भागात सतत पाणी राहिल्याने मूळकूजचा प्रकार दिसत आहे. अशा क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे. तर बोंडे काळवंडल्याने १५ ते २० टक्के नुकसान गृहीत धरले जात आहे.

या महिन्यात कमी पाऊसमान व अधिक दिवस कोरडे वातावरण राहिले असते, तर दिवाळीच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकात वेचणी झाली असती. तसेच बोंडेही फारशी काळवंडली नसती. अतिपाऊस किंवा प्रतिकूल वातावरणामुळे कुठेही ५० टक्‍क्‍यांवर नुकसान झालेले नसले तरी, पहिल्या वेचणीवर पाणी फिरणार असून, हंगाम लांबणीवर पडेल, अशी स्थिती आहे.

कारण नवे पाते, फुले व कैऱ्या तयार होण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागतो. यानंतर बोंडे तयार होतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच यंदा कैऱ्या तयार होण्याचे प्रमाण हलक्‍या व काळ्या कसदार जमिनीत कमीच असून, हंगाम फारसा जोमात नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

प्रतिक्रिया
धुळ्यातील शिरपूर व काळी कसदार जमीन असलेल्या भागातील पूर्वहंगामी कापूस पिकात सततच्या पावसाने बोंडे काळवंडली आहेत. आमच्याकडे तर मागील २८ दिवस पाऊस आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण नाही. यामुळे ही समस्या दिसत आहे. १५ टक्‍क्‍यांवर नुकसान आहे. त्यासंबंधी नेमके सर्वेक्षण झालेले नसल्याने आकडेवारी स्पष्टपणे सांगता येणार नाही.
- डॉ. पंकज पाटील, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, धुळे

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...