agriculture news in Marathi cotton crop damage after pesticide spraying Maharashtra | Agrowon

फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या माना 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने कपाशीवर फवारणी केल्यानंतर पीक सुकत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने कपाशीवर फवारणी केल्यानंतर पीक सुकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाने व बोंडांना गळती लागल्यामुळे चिंता वाढली आहे. याबाबत संबंधित शेतकरी कीटकनाशक कंपनी व कृषी विभाग कार्यालयात पायपीट करून व्यथा मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. 

अकोला-आपातापा मार्गावरील घुसरवाडी येथील शेतकरी भूषण उर्फ प्रवीण जीवनराव पाटील यांनी २० एकरात यावर्षी कपाशीची लागवड केली. सुरवातीपासून पाऊस चांगला असल्याने पीक जोमात होते. कपाशीवर आलेल्या किडीसाठी त्यांनी ९ सप्टेंबर रोजी एका कंपनीचे पाच ते सहा प्रकारचे कीडनाशक यंत्राच्या साहाय्याने फवारणी केली. त्यानंतर त्यांच्या पिकात सुधारणा होण्याऐवजी कपाशी पिकाने माना टाकण्यास सुरुवात केली. पानांची गळती होऊ लागली. बोंडही गळून पडले. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने कंपनीकडे संपर्क साधला.

सुरुवातीला कंपनीने सुधारणा होईल, प्रतिक्षा करा म्हणून बोळवण केली. पण पिकात कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर पाटील यांनी मंगळवारी (ता. १३) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली. 

घाईघाईत केली पाहणी 
तक्रारीनंतर कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधित शेतकऱ्याच्या शेतात कापूसतज्ज्ञ, कृषी अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधींनी बुधवारी (ता. २१) धावती भेट दिली. एकाच शेतात जाऊन कपाशीची पाहणी केली. कोणतेही तपशील न घेता घाईघाईत अधिकारी निघून गेल्याचे शेतकऱ्याने सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर...परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (...
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग...नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा...
`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तनपरभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प...
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या...अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक...
मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गतीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक...
धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र...गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या...
खानदेशात लाल कांद्याची आवक रखडलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे...
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित...शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते...
देशव्यापी संपात २५ कोटी कर्मचारी सहभागीनवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात...
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी...भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे...
सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार...सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित...
पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७...चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील...
पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...नांदेड : शेतीपिकांच्या नुकसानीपश्‍चात भरपाई...
अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे : अजित पवारपंढरपूर, जि. सोलापूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर...
संत श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा...हिंगोली ः श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...