agriculture news in Marathi cotton crop in kharip and wheat in rabbi will be good Maharashtra | Agrowon

खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले पीक :  भेंडवळचा अंदाज

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

या हंगामात सर्वसाधारण पाऊसमान राहणार असून, खरिपात कपाशी, तर रब्बीत गव्हाचे पीक चांगले येईल.

भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण पाऊसमान राहणार असून, खरिपात कपाशी, तर रब्बीत गव्हाचे पीक चांगले येईल. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी असेल तर रोगराईचे वर्ष असून देशासमोर आर्थिक अडचणी वाढलेल्या असतील, असा अंदाज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मागील साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून होत असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीद्वारे शनिवारी (ता. १५) वर्तविण्यात आले. 

मागील वर्षीपासून कोरोनामुळे ही मांडणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत केली जात आहे. भेंडवळ येथील चंद्रभान महाराज वाघ यांचे सध्याचे वंशज पुंजाजी वाघ, गजानन वाघ यांच्यासह सारंगधर महाराज वाघ व इतरांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि शनिवारी सकाळी सूर्योदयापूर्वी घटमांडणीचे निरीक्षण करीत अंदाज वर्तविले. 

दरवर्षी या मांडणीच्या ठिकाणी अंदाज ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी होत असते. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे येथे गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला. यंदाही संचारबंदी लागू केलेली असल्याने पाच जणांच्या उपस्थितीत मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आले. या घटमांडणी अंदाजांच्या आधारे आजही अनेक शेतकरी खरीप व रब्बी हंगामाचे नियोजन करीत असतात. 

यंदा जूनमध्ये साधारण स्वरूपाचा पाऊस असून जुलैत जोरदार असेल. त्यानंतर ऑगस्टमध्ये पाऊस जुलैच्या तुलनेत कमी होईल. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी होत जाईल. जूनमध्ये सार्वत्रिक पाऊस होण्याची चिन्हे नसल्याने पेरण्यासुद्धा मागे-पुढे होऊ शकतात. यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण कमी असून चारा व पाणीटंचाईची शक्यता काही भागांत भेडसावू शकते. 

पीकपरिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार खरिपात कपाशी, ज्वारीचे पीक चांगले दर्शविले आहे. मूग, उडीद साधारण येईल. तुरीचे पीकही साधारण आहे. तिळाचे पीक चांगले असेल. रब्बी हंगामात गव्हाचे पीक चांगले येईल. हरभऱ्याचे पीक साधारण येणार असले, तरी हरभऱ्याचे दर वाढलेले राहू शकतात. इतर पिके कमी-अधिक प्रमाणात साधारण स्वरूपाची होतील, असे सांगण्यात आले. 

रोगराई कायम 
सध्याच्या काळात सर्वत्र रोगराई पसरलेली आहे. रोगराईचे प्रमाण आगामी वर्षातही काही प्रमाणात कायम राहील. यामुळे आर्थिक अडचणी आणखी वाढतील. देशासमोर आर्थिक अडचणी वाढणार आहेत. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम असेल, परंतु त्याच्या भोवतीची संकटे वाढलेली असतील. 

महिनानिहाय पाऊस 
जून ः
साधारण 
जुलै ः जोरदार 
ऑगस्ट ः साधारण 
सप्टेंबर ः सर्वसाधारण 
अवकाळी ः प्रमाण कमी 
 


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...