agriculture news in Marathi, cotton crop in threat of decease in Khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूज

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

जळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील काही काळ्या कसदार जमिनीच्या भागात अतिपावसाने मूळकूजचा धोका वाढला आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाने ताण दिल्यानतंर जोरदार हजेरी लावल्याने आकस्मिक मर रोग दिसत असल्याची माहिती आहे. 

जळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील काही काळ्या कसदार जमिनीच्या भागात अतिपावसाने मूळकूजचा धोका वाढला आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाने ताण दिल्यानतंर जोरदार हजेरी लावल्याने आकस्मिक मर रोग दिसत असल्याची माहिती आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, शहादा, तळोदा, यावल, जळगाव, अमळनेर या काळ्या कसदार जमिनीच्या, तापी काठालगतच्या भागात जुलैमध्ये पावसाचा ताण पडला होता. नंतर जोरदार पाऊस आल्याने या भागात आकस्मिक मर रोग दिसून आला. चोपडा तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे पूर्वहंगामी कापूस पिकात दोन दिवसांतच अनेक झाडे निस्तेज झाली, त्यात पान व फुलगळ होऊन ती पूर्णतः नष्ट झाले.

यावर उपाय काय करायचे, अशी विचारणा त्यांनी जळगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कापूस संशोधन केंद्रात मोबाईलद्वारे संपर्क साधून केली होती. या संदर्भात या शेतकऱ्यांना आकस्मिक मर रोगाची कारणे व उपाय याची माहिती या केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिली. तर जुलैअखेरच्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस थांबत नसल्याने आता काळ्या कसदार जमिनीत पूर्वहंगामी कापूस पिकात मूळकूजचा धोका वाढल्याची भीती नुकतेच कापूस संशोधन केंद्राने व्यक्त केली. 

ज्या शेतात पाण्याचा निचरा, खतांचे व्यवस्थापन व्यवस्थित नाही, त्या क्षेत्रात मूळकूजचा अधिक धोका असल्याचे या केंद्रातील शास्त्रज्ञांनी सांगितले. खानदेशात काळी कसदार जमीन तापीकाठी मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, यावल, चोपडा, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, शहादा व नंदुरबार तालुक्‍यांत आहे. तसेच पाचोरा, धरणगाव, जामनेरातही काही भागांत काळी कसदार जमीन आहे.

अशा भागात पाण्याचा निचरा होत नसल्यास मूळकूजचा धोका वाढल्याचे सांगण्यात आले. तसेच अद्याप तरी मूळकूजसंबंधी कुठल्या शेतकऱ्याने तक्रार केलेली नाही किंवा आपलेही तसे कुठे निरीक्षण नसल्याचे कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सांगितले. आकस्मिक मर रोग दूर करण्यासंबंधी १०० लिटर पाण्यात दीड किलो युरिया व दीड किलो पांढरे पोटॅश याचे मिश्रण करून त्याचे ड्रेचिंग कापूस पिकात करावे. तर अतिपावसानंतर मूळकूज दिसून आल्यास १०० लिटर पाण्यात ५०० ग्रॅम कॉपर ऑक्‍सी क्लोराईड मिसळून त्या द्रावणाचे ड्रेचिंग करावे. पाणी शेतात साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. संजीव पाटील यांनी दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...
यवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी...यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी...यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे...
आंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक...
नीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही...
चारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन,...सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या...
पशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या...कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन...
पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे निधन कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग...