खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवड

जळगाव ः खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा लागवड वाढेल असा अंदाज होता. पण लागवड मागील वर्षाएवढीच राहील, असे दिसत असून सुमारे आठ लाख हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे.
Cotton cultivation on eight lakh hectares in Khandesh
Cotton cultivation on eight lakh hectares in Khandesh

जळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा लागवड वाढेल असा अंदाज होता. पण लागवड मागील वर्षाएवढीच राहील, असे दिसत असून सुमारे आठ लाख हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. 

मागील आठवड्यातील अहवालानुसार लागवड आठ हेक्टरवर झाल्याचे दिसत आहे. या आकडेवारीत या आठवड्यातील अहवालानंतर सुधारणा होऊ शकते. कापसाची जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा होती. धुळ्यातही सुमारे एक लाख ५० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. तर नंदुरबारातही सुमारे ५० हजार हेक्टरवर लागवड पूर्ण झाल्याची माहिती मिळाली. 

पाऊस लांबल्याने काही शेतकरी लागवड टाळत आहेत. यामुळे लागवड अपेक्षेएवढी होणार नाही, असे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पण काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू कापसाची लागवड सुरू आहे. ३० जुलैपर्यंत कापूस लागवड केली जाते. यामुळे लागवड सुरूच राहील. अंतिम लागवडीचे आकडे ऑगस्टच्या मध्यात समोर येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

देशी कापूस वाणांचा तुटवडा

शहादा, यावल, जामनेर, पाचोरा आदी भागात देशी कापूस वाणांची लागवडही काही शेतकरी करीत आहेत. परंतु या वाणांचा तुटवडा आहे. सोमवारी (ता.१९) चांगला पाऊस सर्वदूर झाला. त्यामुळे कापूस लागवडीला आणखी वेग येईल, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com