agriculture news in Marathi cotton damage by rain Maharashtra | Agrowon

पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !

संतोष मुंढे
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या मशागतीत व सोईत कमी पडलो नाही. पण सतत पडणाऱ्या पावसाने कपाशीला चांगली बोंड फुटलीच नाही. 

औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या मशागतीत व सोईत कमी पडलो नाही. पण सतत पडणाऱ्या पावसाने कपाशीला चांगली बोंड फुटलीच नाही. एक ना दोन वेचणीतच कापसाचा खेळ खल्लास होतोय. एकरी जिथं दहा-बारा क्विंटल होईल वाटलं तिथं तीन चार क्विंटल कापूस होतोय का नाही देव जाणे.

कुटुंबात जवळपास सोळा एकर कपाशीचे क्षेत्र असलेल्या खादगाव (ता. पैठण) येथील युवा शेतकरी चैतन्य कोल्हे सततच्या पावसाने शेतीच्या अर्थकारणाच्या कोलमडलेल्या अवस्थेची मांडणी करत होते. चैतन्य म्हणाले, की पोळ्यानंतर पाऊस दम खाईल असं वाटलं, पण पोळ्यानंतरच पावसाने दणका दिला. जुनेजाणते लोक असं कधी झालं नव्हतं, असं सांगतात. खर्चाचं गणित पाहिले तर कपाशीचे पीक उत्पादन खर्च काढून देईल असं वाटत नाही. वेचणीला प्रतिकिलो १२ ते १३ रुपये मोजावे लागत आहेत. मजूर मिळत नसल्याने माझाच काय अनेक शेतकऱ्यांचा कापूस पडून आहे. तो पाण्यात भिजल्याने चार हजार पुढे दर मिळत नाही. सारं अवघड आहे. पण परवडत नाही म्हणून फुटलेला, भिजलेली कापूस शेतात ठेवताही येत नाही. तीस किलोमीटर वरून गाडी भाडे दररोज दीड हजार खर्च करून मजूर आणले.

आधी पाऊस उघडल्यानंतर थोडा सुकला की कापूस वेचून म्हणून ठेवला त्यात पुन्हा पावसाने खोडा घातला, पावसानं वैतागून सोडलंय. शेत शेवाळली एवढा पाऊस झालाय. सारी शेती यंदा तोट्यातच आहे. शेकटा (ता. गंगापूर) येथील कयूम शेख म्हणाले, की पाच एकरात मुगाची पेरणी केली. पण सततच्या पावसाने मूग काळे पडले. दरवाढीच्या आशेने ते घरी ठेवले. पण दर काही वाढेना. आता महिनाभरापासून लासूरच्या बाजारात विक्रीसाठी दिले तर त्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढे कोणी विचारेना. वीस हजार रुपये मुगा साठी खर्च झाला अन हाती ४००० येतात की नाही सांगता येत नाही. आले पिकात अजूनही पाणी खेळतय, कपाशीची तर पुरती वाट लागली. यंदा पावसाने जरा खेळ मांडलाय सरकारनं आमच्या अवघड परिस्थितीचा विचार करून मदतीचा हात द्यावा.

प्रतिक्रिया
पाच एकर कपाशीतून आठ ते नऊ क्विंटल दर्जा घसरलेला कापूस हाती आला. त्याला बाजारात साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल पुढे कोणी विचारेना. ५५ हजार कपाशीवर खर्च झाला. तुरीचा पहिला बहारही गळून पडला.
- भरत गीते, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करण म्हणजे जुगार खेळल्यागत झालं. एखाद्यावर्षी डाव जिंकला की ४ ते ५ वर्ष धोका झाल्या शिवाय राहत नाही. मजुरांना जवळपास उत्पन्नाच्या अर्धी मजुरी द्यावी लागते. मशागत, बियाणे, खते, फवारणी असे मिळून काही शिल्लक राहत नाही. यंदा पावसानं व्हत्याच नव्हतं केलं. अजून महिनाभर वापसा येणार नाय अशी स्थिती आहे.
- सुमंत कडेठाणकर, कडेठाण ता. पैठण जि औरंगाबाद


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...