agriculture news in Marathi cotton deduction in govt procurement Maharashtra | Agrowon

शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून लूट 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार दिला. दरात सुधारणा झाली, पण लागलीच या केंद्रांवरही शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. 

जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार दिला. दरात सुधारणा झाली, पण लागलीच या केंद्रांवरही शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. ओलाव्याचे कारण सांगून क्विंटलमागे तीन ते पाच किलो एवढे कापसाचे वजन कमी करणे (कटती), कापूस बैलगाडी, ट्रॅक्टरमधून काढून वाहन रिकामे करणे, त्याची तोलाई यापोटीदेखील शेतकऱ्यांकडून एक क्विंटलसाठी २० ते २५ रुपये वसूल केले जात आहेत. 

कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी सुरू केली आहे. खरेदी वेगात सुरू आहे. खानदेशात जळगावमध्ये जळगाव, जामनेर, पहूर (ता.जामनेर), शेंदूर्णी (ता.जामनेर), पाचोरा, भुसावळ, बोदवड, चोपडा, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार येथे ‘सीसीआय’ची खरेदी केंद्र सुरू आहे. यातील अनेक केंद्रांमध्ये कटती व हमाली, तोलाईचे पैसे शेतकऱ्यांकडून वसूल केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत काही तक्रारी बाजार समितीपर्यंत पोचल्या आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. 

या कटतीला सीसीआयच्या कर्मचाऱ्याची (ग्रेडर) मूक सहमती असल्याची स्थिती आहे. कारण खरेदी ग्रेडरच्या देखरेखीत केली जाते. खरेदीसाठी खासगी जिनींग प्रेसिंग कारखाने भाडेतत्त्वावर सीसीआयने निविदा प्रक्रिया राबवून घेतले आहेत. 

क्विंटलमागे २८० रुपयांचा फटका 
कारखानदार आपल्याला अधिकाधिक नफा मिळावा, यासाठी कटती व तोलाई, हमालीसंबंधी वसुली करण्यास प्रोत्साहन देत असल्याच्या तक्रारी आहेत. यात कापसात ओलावा असल्याचे सांगून एक क्विंटल कापसात तीन ते पाच किलो कापसाचे वजन कमी करतात. याला काटामार किंवा कटतीचा प्रकार खानदेशात म्हटले जाते. सध्या कापसाला शासकीय दर किमान ५६६२ व कमाल ५७२५ रुपये मिळत आहे. अर्थातच एक क्विंटल कापसात २८० रुपये शेतकऱ्यांना कमी मिळत आहेत. तसेच हमाली तोलाईपोटी शेतकऱ्याला कारखान्यातील कर्मचाऱ्याकडे एक क्विंटलसाठी २० ते २५ रुपये द्यावे लागत आहेत. 

विरोध करणाऱ्यांच्या कापसाला नकार 
विशेष म्हणजे कटती, तोलाई, हमालीच्या वसुलीबाबत कुठलीही पावती शेतकऱ्याला दिली जात नाही. जे विरोध करतात, त्यांचा कापूस खरेदी न करण्याचा पवित्रा खरेदी केंद्रात घेतला जातो, असे एका शेतकऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. 
 


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...