खरेदी केंद्रात कापसाच्या आवकेत घट

खरेदी केंद्रात कापसाच्या आवकेत घट
खरेदी केंद्रात कापसाच्या आवकेत घट

जळगाव : खानदेशातील खरेदी केंद्रांमध्ये कापसाची आवक मागील आठवड्यापासून सतत कमी होत आहे. सध्या कापसाची खेडा खरेदी वेगात सुरू आहे. शेतकऱ्यांना गावातच ५६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत असल्याची स्थिती आहे. 

गावात खेडा खरेदीत कापसाची तोलाई शेतकऱ्याच्या घरानजीकच केली जाते. त्यानंतर लागलीच रोखीने पैसे मिळतात. दुसऱ्या बाजूला शासकीय खरेदी केंद्रात कमाल ५४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. कापूस विकल्यानंतर चार ते पाच दिवसात पैसे शेतकऱ्यांना बॅंक खात्यात मिळतात. यामुळे शेतकरी सध्या गावातच एजंटना आपल्या कापसाची विक्री करीत आहेत. 

खेडा खरेदसाठी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, चोपडा व मध्य प्रदेशातील सेंधवा येथील जिनिंग कारखानदारांचे एजंट व गुजरातमधील कापूस प्रक्रिया उद्योजकांचे मध्यस्थ येत आहेत. १५ मेट्रिक टन क्षमतेच्या ट्रकमध्ये कापसाची वाहतूक सुरू आहे. यामुळे स्थानिक जिनिंग कारखानदारांना कापूसटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमाल कापूस मध्य प्रदेश व गुजरातेत जात आहे. खानदेशातील जिनिंग कारखानदारांच्या तुलनेत खेडा खरेदीदार अधिक दर देत असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. 

खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) शहादा व नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत एरंडोल व जळगाव येथे कापूस खरेदी सुरू केली. बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक असल्याने या केंद्रांत अपेक्षित आवक नाही. मागील आठवड्यापर्यंत सुमारे चार हजार क्विंटल कापसाची खरेदी या केंद्रांमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com