पांढरं सोनं घरातच लॉकडाऊन

येत्या २० एप्रिलपासून राज्यात कापूस खरेदी सुरु होणार आहे. तशा सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची खबरदारी घेऊन ही खरेदी सुरु होईल. सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन, मास्क आदी गोष्टींचा वापर करण्याचे निर्देश सर्व बाजार घटकांना दिलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याची अडवणूक, कुचंबणा होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. — बाळासाहेब पाटील, सहकार व पणनमंत्री
cotton
cotton

पुणे ः  लॉकडाऊनमुळे २१ मार्चपासून हमीभावाने कापूस खरेदीची सरकारी केंद्रे बंद असल्याने शेतकऱ्यांना कापूस घरातच ठेवावा लागत आहे. त्यातच तापमान ४० डिग्रीच्यावर जात असल्याने त्याचा परिणाम दर्जावर होत आहे. तसे हे दिवस खरिपाच्या तयारीचे असताना शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मात्र घरातच लॉकडाऊन आहे. त्यामुळे खरिपाची तजवीज कशी करायची या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरु करावीत, अन्यथा आगामी खरीप हंगामच संकटात येईल, अशी भीती या क्षेत्रातून व्यक्त होत आहे. यंदाचा कापूस हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा पाहणाराच ठरला. पावसाअभावी उशिरा लागवड, अवकाळीचा फटका, शासकीय खरेदीतील विस्कळीतपणा आणि खासगीत कमी दर यात शेतकरी पुरता पिचला गेला. आता कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जारी केलेल्या संचारबंदीमुळे राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) तसेच खासगी व्यापाऱ्यांची कापूस खरेदी गेल्या २५ दिवसांपासून बंद आहे.  खानदेशात सुमारे पाच टक्के कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा जवळपास २५ ते ३० टक्के कापूस विक्रीविना पडून आहे. आधीच उत्पादन खर्चाला न परवडलेला कापूस विकला जाईल की नाही असा प्रश्न कापूस उत्पादकांना पडला आहे. बहुतांश जिनिंगमध्ये काम करणारे मजूर हे मध्यप्रदेश वा आंध्र प्रदेश मधील होते. ते निघून गेल्याने खरेदी प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांकेड सुमारे पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस पडून आहे. निर्यात धोरण निश्चित नसल्याने गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थानात मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी फारशी कापसाची खरेदी केलेली नाही. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुमारे सात लाख क्विंटल कापूस घरातच पडून आहे.  शेतकऱ्यांचे कोलमडले नियोजन

  • हंगामाच्या सुरवातीपासून कापसावर संकटांची मालिका
  • वाढत्या तापमानाचा कापसाच्या दर्जावर होतोय परिणाम
  • निर्यात धोरणातील अनिश्‍चिततेमुळे खासगी व्यापाऱ्यांकडून कमी खरेदी
  • खासगी व्यापाऱ्यांकडून ५ हजारापेक्षा कमी दर 
  • शेतकऱ्यांची मशागत, खते, बियाणे खरेदी रखडली
  • पूर्व मोसमी कापूस लागवडीही धोक्यात येण्याची शक्यता
  • ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सूचविलेले उपाय 
  • कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीचा पर्याय 
  • नोंदणी करताना शेतकऱ्यांची वैयक्‍तिक माहिती व शिल्लक कापसाची नोंद घेणे. 
  • नोंदणी झाल्याबाबतचा एसएमएस शेतकऱ्याला मिळावा. 
  • एका खरेदी केंद्रावर २० ते ४० वाहनांची मर्यादा असावी. 
  • २५ वाहने आल्यास वाहन चालक, शेतकरी याप्रमाणे दोघे अपेक्षित धरल्यास ५० व्यक्‍ती होतील. 
  • जिनिंग फॅक्‍टरीचा परिसर चार ते पाच एकराचा असतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्‍य. 
  • जिनिंग परिसरात संपूर्ण सॅनीटायझरची सोय. 
  • वाहनातून कापूस काढण्यासाठी ६ मजुरांची गरज भासते. त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर पाळावे. 
  • एफ.एफ.क्‍यु. दर्जाच्या कापसाला ५५५० रुपयांचा भाव आहे. परंतु शिल्लक एकूण ८० लाख क्‍विंटलपैकी १५ ते २० टक्‍के कापूस त्या दर्जाचा नाही. त्यामुळे नवीन ग्रेड ठरवीत, दर निश्‍चीत करण्याची गरज आहे 
  • प्रतिक्रिया लॉकडाऊनच्या काळातही राज्यात काही ठिकाणी तूर आणि हरभरा खरेदी सुरु होतीच. मात्र, कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याने सामाजिक अंतर पाळता येत नव्हते. आता केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार शेतीमाल खरेदीला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे येत्या २० तारखेपासून राज्यातही कापूस खरेदी सुरु होणार आहे. त्यासाठी पणन विभागाच्यावतीने सीसीआय आणि महाराष्ट्र कापूस महासंघाला कापूस खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर सीसीआय आणि महाराष्ट्र कापूस महासंघामार्फत खरेदीची तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी जिनिंग मिल बंद आहेत, त्याठिकाणचे मजूर निघून गेले आहेत. अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून कापूस खरेदी सुरु होणार आहे.  - अनुप कुमार , प्रधान सचिव, पणन

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com