अकोला जिल्ह्यात मजूरटंचाईमुळे कापूस शेतांमध्येच

अकोट तालुका हा कापसासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांना दरवर्षी कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. सातपुड्यातील आदिवासींवर कापूस वेचणीचा मोठा भार आहे. स्थानिक मजुरांना वेचणीसाठी आठ ते १० रुपये प्रतिकिलो दर द्यावा लागतो. बाजारभावाच्या तुलनेत चौथा हिस्सा खर्च हा केवळ आता वेचणीवर होत आहे. बोंड अळी व्यवस्थापन, मशागत, खत, बियाणे यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. यामुळे कापूस पिकाचा खर्च वाढतच आहे. शिवाय दर देऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत, ही एक वेगळीच समस्या आहे. -अनुप साबळे, कापूस उत्पादक, तरोडा, जि. अकोला
cotton on field
cotton on field

अकोला ः शेतीकामांसाठी दिवसेंदिवस मजूर समस्या भीषण होत चालली आहे. मागील काही वर्षांत कापूस उत्पादकांना वेचणी करण्यासाठी मजूर मिळनासे झाले आहेत. जे मजूर मिळतात त्यांना अधिकचा दर द्यावा लागत असल्याने कापूस उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली. दुसरीकडे कापसाचे बाजारमूल्य होते तेवढेच कायम असल्याने दुहेरी आर्थिक फटका या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सध्या कोरडवाहू पट्ट्यात सर्वत्र कापूस वेचणीला आलेला असून, असंख्य शेतांमध्ये बोंडांमधून उमललेला कापूस झाडांवरच असल्याने शेतशिवारे सर्वत्र पांढरी झालेली बघायला मिळत आहेत. राज्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह इतर जिल्ह्यात यंदा कापूस लागवड वाढली होती. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे ११ लाख २६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. राज्याचे कापूस लागवड क्षेत्र ४३ लाख ८४ हजार हेक्टरपर्यंत पोचले होते. ओलिताचा कापूस हंगाम अंतिम टप्प्यात असून, कोरडवाहू कापूस वेचणीचा हंगाम अद्याप अर्ध्यातच आहे. या वर्षीचा परतीचा पाऊस कोरडवाहू कपाशीसाठी पोषक ठरला. आधी नुकसान झाले तरी अनेक शेतांमध्ये पुनर्बहर आल्याने कापूस पट्ट्यात या पिकाची स्थिती सुधारली होती. आत या शेतांमध्ये कापसाची वेचणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रब्बी लागवड, तूर काढणी व कापूस वेचणी अशी कामे एकाच वेळी सुरू आहेत. मात्र मजूर होते तेव्हढेच असल्याने सर्वत्र मजुरांची ओढाताण सुरू असल्याचे चित्र आहे. मजूर समस्येमुळे कापूस वेचणीला सर्वाधिक फटका बसलेला आहे.  सध्या कापूस वेचणी आठ ते १० रुपये प्रतिकिलोने करावी लागत आहे. हा दर देऊनही अनेकांना मजूर मिळत नसल्याने वेचणीचा कापूस अनेक दिवसांपासून झाडांवरच आहे. अधिक दिवस लोटत असल्याने कापसातील कोरडेपणा वाढून त्याचा परिणाम वजनावर होत आहे.  कापूस वेचाई सरासरी ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल द्यावी लागत आहे. बाजारात कापसाचा दर सरासरी ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com