राज्यभरात शेतकरी संघटनेचे ‘मूठभर कापूस जाळा’ आंदोलन 

मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२२) कापूस जाळा आंदोलन करण्यात आले.
agitation
agitation

पुणेः कापसाची सरसकट व १०० टक्के खरेदी करावी, नॉन एफएक्‍यू (कमी दर्जा) कापसाला खरेदी केंद्रात नाकारू नये, मध्यम व आखुड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास , भावांतर योजना सुरु करावी, कांद्याचीदेखील नाफेड व इतर संस्थांनी सरसकट खरेदी करावी, या मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२२) कापूस जाळा आंदोलन करण्यात आले.  कापुस खरेदी बाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभरात मूठभर कापूस जाळून आंदोलन केले. सरकारने खरेदी केंद्र वाढवून जलद गतीने कापूस खरेदी करावा. तसेच सीसीआयला लांब, मध्यम व आखूड धाग्याचा कापूस खरेदी करण्याचा आदेश द्यावा. जर सरकार कापूस खरेदी करू शकत नसेल तर भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा नाफेडमार्फत शासनाने दोन हजार रुपये किंटलने खरेदी करावा. या मागण्यांसाठी, कांदा व कापसाची कोंडी फोडण्यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. 

यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले. मराठवाड्यात औरंगाबाद, खादगांव (ता.पैठण), परभणी जिल्ह्यात संबर (ता.परभणी), कोक, मारवाडी (ता.जिंतूर), ढेंगळी पिंपळगाव, धनेगाव, कान्हड (ता.सेलू), मानोली (ता.मानवत), थडी उक्कडगाव, थडी पिंपळगाव, वाडी पिंपळगाव, कोथाळा, नरवाडी, वडगाव, सोनपेठ(ता.सोनपेठ) आदीसह पाथरी, पूर्णा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मूठभर कापूस जाळो आंदोलन करण्यात आले. 

अकोला येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत सीसीआयच्या कार्यालयासमोर कापूस जाळला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात शेणपूर, प्रतापपूर, छाईल, शिरवाडे, देगावे आदी गावांमध्ये आंदोलन झाले. जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com