agriculture news in Marathi cotton fire agitation of Shetkari sanghtna Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यभरात शेतकरी संघटनेचे ‘मूठभर कापूस जाळा’ आंदोलन 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२२) कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. 

पुणेः कापसाची सरसकट व १०० टक्के खरेदी करावी, नॉन एफएक्‍यू (कमी दर्जा) कापसाला खरेदी केंद्रात नाकारू नये, मध्यम व आखुड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास , भावांतर योजना सुरु करावी, कांद्याचीदेखील नाफेड व इतर संस्थांनी सरसकट खरेदी करावी, या मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२२) कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. 

कापुस खरेदी बाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभरात मूठभर कापूस जाळून आंदोलन केले. सरकारने खरेदी केंद्र वाढवून जलद गतीने कापूस खरेदी करावा. तसेच सीसीआयला लांब, मध्यम व आखूड धाग्याचा कापूस खरेदी करण्याचा आदेश द्यावा.

जर सरकार कापूस खरेदी करू शकत नसेल तर भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा नाफेडमार्फत शासनाने दोन हजार रुपये किंटलने खरेदी करावा. या मागण्यांसाठी, कांदा व कापसाची कोंडी फोडण्यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. 

यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले. मराठवाड्यात औरंगाबाद, खादगांव (ता.पैठण), परभणी जिल्ह्यात संबर (ता.परभणी), कोक, मारवाडी (ता.जिंतूर), ढेंगळी पिंपळगाव, धनेगाव, कान्हड (ता.सेलू), मानोली (ता.मानवत), थडी उक्कडगाव, थडी पिंपळगाव, वाडी पिंपळगाव, कोथाळा, नरवाडी, वडगाव, सोनपेठ(ता.सोनपेठ) आदीसह पाथरी, पूर्णा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मूठभर कापूस जाळो आंदोलन करण्यात आले. 

अकोला येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत सीसीआयच्या कार्यालयासमोर कापूस जाळला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात शेणपूर, प्रतापपूर, छाईल, शिरवाडे, देगावे आदी गावांमध्ये आंदोलन झाले. जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून...औरंगाबाद ः कृषी निविष्ठा  विक्रेत्यांच्या...
सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या...नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या...
एकाच आॅनलाइन अर्जावर कृषी योजनांचा लाभ...मुंबई  : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधावर जात...लातूर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या...
न्यायालयाच्या भूमिकेनंतर गुणनियंत्रण...पुणे  : बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...
शेतकऱ्यांनो, एक वर्ष सुटी घ्यायची का?जगभरात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाइड/जीएम)...
...अन्यथा कृषी सहसंचालकांना अटक करून...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात...
`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेनानागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा...
काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा ...अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत...
नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात...नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला...
दुग्धोत्पादकांना लिटरमागे १० ते १२...नगर ः अनेक शेतकऱ्यांसह बेरोजगारीवर मात करण्यासाठी...
धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोरपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात...
अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमणपुणे ः खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच...
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का...नाशिक ः फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक...
देशात ९२ लाख हेक्टरवर कापूसमुंबई: देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे....
राज्यातील धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठापुणे : जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच...