पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ५
ताज्या घडामोडी
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड. कोठारी
वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराऐवजी कापसाची विक्री न करता सीसीआयला तो द्यावा. त्यासोबतच सोयाबीन शेतमाल तारण योजनेत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी केले.
वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराऐवजी कापसाची विक्री न करता सीसीआयला तो द्यावा. त्यासोबतच सोयाबीन शेतमाल तारण योजनेत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी केले.
डॉ. कोठारी म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या आवारात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)द्वारे ८ ते १२ टक्के आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात आहे. ५३२८ ते ५५५० रुपयांचा दर अशा कापसाला मिळत आहे. सीसीआयद्वारे आठ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाला ५५५० रुपयांचा हमीभाव दिला जात आहे. जास्तीत जास्त १२ टक्के आर्द्रतेच्या कापसाची खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुकलेला शेतमालच विक्रीकरिता आणण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी. सीसीआयला कापूस विक्रीसाठी आणताना या वर्षाचा सातबारा, आयएफएससी कोड व खाते नंबर असलेल्या बॅंक पासबुकची झेरॉक्स, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक अशी माहितीसोबत आणावी. सीसीआयकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाची रक्कम थेट बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.’’
या वेळी उपसभापती हरीश वडतकर, संचालक मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, शेषकुमार येरलेकर, उत्तम भोयर, ओमप्रकाश डालिया, विनोद वानखेडे, अशोक उपासे, राजेश मंगेकर, राजेश कोचर, सुरेश सातोकर, बळीराम नासर, बापूराव महाजन, सुरेश वैद्य, पंकज कोचर, संजय तपासे, संजय जैन, संजय कातरे, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे, सचिव टी.सी. चांभारे व शेतकरी उपस्थित होते.
सोयाबीन ठेवा तारण
सध्या बाजारात सोयाबीन ३९०० रुपये क्विंटलपर्यंत विकल्या जात आहे. दरात आणखी तेजीची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांनी घरी साठवणुकीची सोय नसल्यास बाजार समितीकडे शेतमाल तारण ठेवावा. तारण योजनेच्या माहितीसाठी बाजार समितीच्या संपर्कात राहण्याचे आवाहन ऍड. कोठारी यांनी या वेळी केले.
- 1 of 579
- ››