हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणी

पारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने डोळे वटारले तद्‌नंतर मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली आली. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले. पुन्हा गुलाब वादळ, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी या चक्रव्यूहात शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पुसली गेली.
Cotton in Hirapur Selling in water
Cotton in Hirapur Selling in water

पारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने डोळे वटारले तद्‌नंतर मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली आली. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले. पुन्हा गुलाब वादळ, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी या चक्रव्यूहात शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पुसली गेली.

जेमतेम उघडीप झाल्यानंतर पुन्हा  मागील आठवड्यात अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातले. आणि पिके पाण्याखाली आली. हाती आलेले पीक वाया जाऊ नये, यासाठी हिरापूर येथील शेतकरी घनश्याम पाटील यांनी अक्षरशः पाण्यातच कपाशी वेचणी केली. शेतातून उत्पन्न निघेना आणि वेचणीसाठी मजूर मिळेना, अशी दैनावस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी शासनाकडे मदतीची आस धरून आहे. मात्र कोरोनामुळे कोणतीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. मागील महिन्यात गुलाबी वादळामुळे तालुक्यातील पाचही मंडळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाकडून तालुक्यातील अतिवृष्टीचा जिल्हा कृषी विभागात प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला असून याबाबत शासनाकडून तत्काळ निर्णय व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

अवकाळीमुळे शेतात आज देखील पाणी साचले आहे.  पिके पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतात टाकलेला पैसा हा उत्पन्न पोटी येईल का नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत. तोच पुन्हा पशुधनावर लम्पी स्कीन आजारामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. जनावरांना गाठी होणे, जखम होणे असा संसर्ग वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची पशुधन विषयी चिंता वाढली आहे.

वाळवण्यासाठी धावपळ

हिरापूर येथील शेतकरी घनश्याम पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, अवकाळीमुळे शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. पुन्हा त्यास वाळत ठेवावे लागत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com