agriculture news in marathi Cotton Market Federation procure ten Thousand quintal Cotton in State | Agrowon

राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 2 डिसेंबर 2020

पणन महासंघाकडून शुक्रवार (ता.२७) पासून कापूस खरेदीस सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे दहा हजार २२१ क्विंटल कापसाची खरेदी १६ केंद्रांच्या माध्यमातून झाली आहे.

नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून शुक्रवार (ता.२७) पासून कापूस खरेदीस सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे दहा हजार २२१ क्विंटल कापसाची खरेदी १६ केंद्रांच्या माध्यमातून झाली आहे.

ॲपच्या माध्यमातून नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे पणन महासंघाकडून हंगामाकरिता प्रस्तावित होते. ही प्रक्रिया रखडल्याने कापूस खरेदीस देखील विलंब होत होता. त्यानंतर ॲप उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे कळाल्यानंतर अखेरीस शुक्रवार (ता.२७) पासून खरेदी सुरू करण्याचा निर्णय पणन महासंघाकडून घेण्यात आला.

राज्यात या वेळी ३० केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जास्तीत जास्त ही संख्या ३६ पर्यंत नेली जाणार आहे.  त्यापेक्षा अधिक केंद्र कोणत्याही परिस्थितीत सुरू केले जाणार नाहीत, असे यापूर्वीच पणन महासंघाकडून सांगण्यात आले आहे. 

३६ केंद्रांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल , असा दावाही केला जात आहे. त्याकरिता नियोजन केल्याची माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारपासून राज्यात कापूस खरेदी सुरू झाली त्यानंतर आजवर सुमारे दहा हजार २२२ क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. सात झोनमधील १६ केंद्रांवर ४१४ शेतकऱ्यांकडून हा कापूस खरेदी करण्यात आला. वीस जिनिंगमध्ये ही खरेदी केली जात आहे.

राज्यात पणनकडून झालेली कापसाची खरेदी

झोन केंद्र संख्या खरेदी (क्विंटल मध्ये)
नागपूर ४ केंद्र ७२८.२४ 
वणी १ केंद्र ५३५.५
यवतमाळ ३ केंद्र ३२६६.७५
अमरावती २ केंद्र ८६९.८
अकोला २ केंद्र ७३
औरंगाबाद २ केंद्र २६८७.७
नांदेड २ केंद्र २०६१.८

 


इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...