agriculture news in marathi, cotton marketing federation to stop repurchase due to corona issue | Agrowon

पणन महासंघाची कापूस खरेदी तूर्त बंद; बुधवारपर्यंत नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 मार्च 2020

नागपूर : कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून राज्यात बुधवार (ता. १८)पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत ही खरेदी बंद राहणार असली, तरी शेतकऱ्यांना बुधवार (ता. २५)पर्यंत कापूस खरेदीकरिता बाजार समितीस्तरावर नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागपूर : कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून राज्यात बुधवार (ता. १८)पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत ही खरेदी बंद राहणार असली, तरी शेतकऱ्यांना बुधवार (ता. २५)पर्यंत कापूस खरेदीकरिता बाजार समितीस्तरावर नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यात या वर्षी ‘सीसीआय’चा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कापूस खरेदी होत आहे. ७४ केंद्र आणि त्यामाध्यमातून १२३ जिनिंगद्वारे ही खरेदी करण्यात आली. आजवर सुमारे ५२.७ लाख क्‍विंटल इतक्‍या विक्रमी कापसाची खरेदी झाली आहे. कापसाला या वर्षी ५५५० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार खरेदी करण्यात आलेल्या या कापसाची किंमत तब्बल २८०० कोटी आहे. यातील २३०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. 

राज्यातील बहुतांश जिल्हा बॅंकांद्वारे येस बॅंकेचा आय.एफ.एस.सी. कोड वापरला जातो. शेतकऱ्यांचे बहुतांशी बॅंक खाते जिल्हा बॅंकेत आहेत. येस बॅंक अडचणीत आल्याने पैसे खात्यात ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया रखडल्यामुळे चुकारे थकले आहेत. हा प्रश्‍न सुटल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. 

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. त्यासोबतच मॉल, सिनेमागृहदेखील बंद करण्यात आले. कापूस पणन महासंघाने देखील कोरोनामुळे खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवार (ता. १८) पासून पुढील आदेशापर्यंत खरेदी बंद राहील. शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाचा अंदाज घेण्यासाठी कापूस पणन महासंघाने आता बाजार समितीस्तरावर नोंदणीचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. बुधवार (ता. २५)पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल. या माध्यमातून शेतकऱ्यांकडील एकूण शिल्लक कापसाचा अंदाज घेत खरेदीचे नियोजन करणे पणन महासंघाला शक्‍य होणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस.एम.एस.द्वारे नंतर कापूस आणण्याची सूचना दिली जाईल.

चुकाऱ्यासाठी एक हजार कोटींचे कर्ज
यापूर्वी चुकाऱ्यासाठी २३०० कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव होता. त्यातील दोन हजार कोटी कर्जरूपातून उभारण्यात आले. उर्वरित पैशाची सोय सरकी विक्रीतून झाली. आता पुन्हा एक हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव बॅंकेला पणन महासंघाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वर्षी खरेदी केलेल्या एकूण कापसापैकी ९४ टक्‍के कापसाचे जिनिंग झाले आहे.

कर्मचाऱ्यांअभावी ५० केंद्रे सुरू करणेही शक्‍य नव्हते. तरीसुद्धा ७४ केंद्रे सुरू करण्यात आले. यामागे ग्रेडरसह सर्वच कर्मचाऱ्यांचे सामूहिक प्रयत्न आहेत. त्यांच्या पाठबळामुळेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण कापूस विक्री प्रक्रियेत भासली नाही. कोरोनामुळे मात्र कापूस विक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत ही खरेदी बंद राहील.’’
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...