Agriculture news in Marathi Like cotton, Nafed's tire purchases slowed | Agrowon

कापसाप्रमाणेच नाफेडच्या तूर खरेदीची गती मंदावली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

कलगाव, जि. यवतमाळ ः कापसाप्रमाणेच नाफेडव्दारे होत असलेल्या तूर खरेदीची गती देखील संथ असल्याने नोंदणीकृत ३१०० शेतकऱ्यांची तूर खरेदीची प्रक्रिया केव्हा पूर्णत्वास जाईल, याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. गेल्या महिनाभरात अवघ्या ३८० शेतकऱ्यांकडूनच तूरीची खरेदी होऊ शकल्याने खरेदीचा वेग वाढवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कलगाव, जि. यवतमाळ ः कापसाप्रमाणेच नाफेडव्दारे होत असलेल्या तूर खरेदीची गती देखील संथ असल्याने नोंदणीकृत ३१०० शेतकऱ्यांची तूर खरेदीची प्रक्रिया केव्हा पूर्णत्वास जाईल, याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. गेल्या महिनाभरात अवघ्या ३८० शेतकऱ्यांकडूनच तूरीची खरेदी होऊ शकल्याने खरेदीचा वेग वाढवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

राज्यात सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाकडून कापसाची खरेदी होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याचा हवाला देत सुरुवातीला १५ ते २० अशा मर्यादित संख्येतील शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करण्यात येत होती. परंतु यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात शिल्लक कापसाची खरेदी शक्‍य होणार नसल्याने खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी झाली.

त्यासंदर्भाने राजकीय दबावही वाढला. अखेरीस केंद्राची संख्या वाढवीत शेतकरी मर्यादेचा निकष हटविण्यात आला. नाफेडव्दारे तूर खरेदीत मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शिफारशीत उपाययोजनांचे पालन होत असल्याने दरदिवशी मोजक्‍याच शेतकऱ्यांकडील तूर खरेदी केली जात आहे. दिग्रस तालुक्‍यातील ३१०० शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकण्यासाठी नोंदणी केली आहे. ज्यांचा नंबर आला अशा शेतकऱ्यांना मोबाईलवर मॅसेज पाठवून केंद्रावर तूर आणण्यास सांगितले जाते.

सुरुवातीला दरदिवशी २० शेतकऱ्यांना असे मॅसेज पाठविले जात होते. त्यानंतर आता ही संख्या ५० करण्यात आली आहे. परंतु खरेदीची गती मंद असल्याने गेल्या महिनाभरात अवघ्या ३८० शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदी करता आली आहे. परिणामी संपूर्ण तुरीच्या खरेदीस बराच कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बाजारात तूर विकल्यास ८०० रुपयांचे नुकसान
शासनाकडून हमीभाव ५८५० रुपये दराने तुरीची खरेदी होत आहे. याउलट व्यापारी मात्र ५००० रुपये क्‍विंटलचाच दर देत आहेत. त्यामुळे ८०० रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचा कल नाफेडला तूर देण्याकडे वाढला आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...