Cotton at Pandharkavada Price of Rs. 5 thousand 827
Cotton at Pandharkavada Price of Rs. 5 thousand 827

पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७ रुपयांचा भाव

चंद्रपूर :बाजार समिती कार्यक्षेत्रातील मारोती कॉटन पांढरकवडा येथे सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.

चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील मारोती कॉटन पांढरकवडा येथे सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. चांगल्या प्रतीच्या कापसाला ५८२७ रुपयांपर्यंतचा दर खरेदीच्या मुहूर्तावर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले. 

बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, उपसभापती रणजित डवरे, संचालक नीरज बोंडे, बाजार समिती सचिव संजय पावडे, सीसीआय केंद्राचे प्रभारी सचिन खुळे, पांढरकवडा सरपंच सूरज तोतडे यांच्या उपस्थितीत खरेदीला प्रारंभ झाला.

सुधाकर वरारकर, गणेश आवारी, चंदू माथने, संजय टिपले, रोशन सावे यांच्या हस्ते केंद्रावर कापूस विक्रीस आणणाऱ्या पहिले दहा शेतकरीऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात  विजय पाचभाई, बबन माथने, विठोबा बोके, आबाजी भोयर, विलास टोंगे, संजय गोटे, संबा निब्रड, सुधाकर होगे, कमलाकर निब्रड, ऋषी सातपुते यांचा समावेश होता.

‘सीसीआयक’डून हमीभावाने खरेदी होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नोंदणीची देखील गरज नसल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com