agriculture news in marathi Cotton from Parbhani, Pathri, Gangakhed will be procured by hamidar | Page 2 ||| Agrowon

परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची हमीदराने खरेदी होणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी, पाथरी, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कापूस खरेदी केली जाणार आहे.

परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी, पाथरी, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कापूस खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी परभणी जिल्हा संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कापूस खरेदीस सुरवात केली जाईल’’, अशी माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेणके यांनी दिली.

पणन महासंघातर्फे यंदाच्या हंगामात कापूस खरेदीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी (ता.३०) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, रेणके, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर, सहकार, पणन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर प्राप्त क्रमांकानुसार एसएमएस पाठविण्यात येईल. नोंदणीधारकास टोकन दिल्यानंतर पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केली जाईल.

शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणताना सोबत २०२०-२१ च्या हंगामातील कापूस पेऱ्याची नोंद असलेला सातबारा, तसेच होर्डिंग प्रमाणपत्राची अद्ययावत प्रत, जनधन खात्यांव्यतिरिक्त अन्य आधार सलंग्न राष्ट्रीयकृत बॅंकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची सुस्पष्ट छायांकित प्रत, आधारकार्डच्या प्रत्येकी दोन प्रती आणाव्यात. कागदपत्रसोबत कार्यरत मोबाईल क्रमांक नमुद करावा.पीकपेऱ्यानुसार कापूस खरेदी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी...नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास...
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी...जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग,...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात...परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी...
जळगावात कापसाच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षाजळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची...
‘बाधित कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई...परभणी ः ‘‘‘बर्ड फ्लू’मुळे मुरुंबा (ता. परभणी)...
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत...पुणे : राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता....
‘परभणी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांत...परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
नाशिक जिल्ह्यातील ४,२२९ उमेदवारांचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गिरणा प्रोड्यूसर कंपनीचा टस्काबेरी...देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे...
पुणे जिल्ह्यात चारपर्यंत ५० टक्के मतदानपुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी...
पुणे जिल्ह्यात ‘महाडीबीटी’चे ६५ हजार...पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर...
आसामच्या चहाचे चाहते!भर्रर्रऽऽ असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेटच्या...
शाश्‍वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धतीग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-...