agriculture news in Marathi, cotton picker machine still not came on filed, Maharashtra | Agrowon

कापूस वेचणी यंत्र बासनात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

या वर्षी कापसाची वेचाई खर्च सहा ते साडेसात रुपये पडत आहे. यांत्रिकिकरणाची गरज आता सामान्य शेतकऱ्यांनाही वाटू लागली आहे. भविष्याची गरज पाहता त्या दृष्टीने संशोधन व्हायला हवे. यंत्राला पूरक ठरतील, असे वाण आले पाहिजेत.
- गणेशराव नानोटे, कापूस उत्पादक शेतकरी, अकोला
 

अकोला: विदर्भ, मराठवाडा, खानदेशाचे प्रमुख पीक असलेल्या कापूस शेतीत अद्यापही पुरेशा प्रमाणात यांत्रिकीकरण झालेले नाही. गेल्या काही काळापासून वेचणीसाठी चांगला भाव देऊनही मजूर मिळत नसल्याची सातत्याने ओरड होत असते. ही बाब लक्षात घेऊन येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पाच-सहा वर्षांपूर्वी वेचणी यंत्रनिर्मितीचे काम सुरू केले. इंजिनिअरिंग कॉलेज व विद्यापीठातील तज्ज्ञांनी हे मॉडेल विकसित केले. याला ‘आयसीएआर’ने निधीही उपलब्ध करून दिला होता. परिणामी, संशोधन पातळीवरचे काम झाले. या प्रकल्पाला ड्रीम प्रोजेक्‍ट म्हणून पुढे नेणारे तत्कालीन कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांचा कार्यकाळ दरम्यान संपला. नंतर हा प्रकल्पसुद्धा गुंडाळल्या गेल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

सध्या कापूस वेचणीचा हंगाम जोरात असून तब्बल पाच ते सात रुपये किलो वेचणीचा दर झालेला आहे. कापसाला भाव अवघा चार हजारांपर्यंत असताना त्यातून वेचाईचा खर्चच क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये होत आहे. असंख्य अडचणी असून अशा परिस्थितीत कापसाचे पिक टिकवायचे असेल तर आता कापूस शेतीचा सर्वांगाने विचार होण्याची गरज बनली आहे. सध्या कापसामध्ये बीटी वाण आल्यापासून उत्पादकता वाढली खरी; परंतु सोबतच खर्चाचे प्रमाणही अव्वाच्या सव्वा झाले. त्या तुलनेत कापसाला मिळणारा भाव कमी आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २०११-१ २ मध्ये कापूस वेचणी यंत्राच्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले होते. याबाबत शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत करार होऊन यंत्र तयार झाले होते. या यंत्राचे सात पेटंट घेण्यात आलेले आहेत.

यंत्राचे प्रत्यक्ष शेतात प्रयोगही घेतल्या गेले. या यंत्रात कॅमेरे लागलेले होते. सेन्सरवर काम करणारे हे यंत्र उमललेली कापसाची बोंडे अलगत टिपत होते. त्याचे प्रयोग उत्साहवर्धक होते. परंतु प्राथमिक अवस्थेत असलेल्या या यंत्राचे व्यावसायिक अंगाने काम वाढविण्यासाठी निर्माते मिळणे गरजेचे होते. त्याला लागणारी गुंतवणूक करणारे व्यावसायिक मात्र मिळाले नाहीत. तसेच तत्कालीन कुलगुरू श्री. मायंदे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर याकडे कुणी फारसे लक्षही दिले नसल्याची प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात आहे.

प्रतिक्रिया
आयसीआयरने त्यांचे सुरू असलेले या आधीचे प्रकल्प बंद करून या प्रकल्पासाठी सीआयसीआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला होता. शेगावच्या गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत करार करण्यात आला होता. याचे मॉडेल तेव्हाच तयार झाले. हा प्रकल्प पुढे गेला असता तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले झाले असते. 
- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंदेकृवि, अकोला

या विद्यापीठात कापूस वेचणी यंत्राबाबत प्रयोग झाला होता; परंतु त्यात वेचणी करताना केरकचरा अधिक येत होता. तो साफ करण्यासाठी खर्च लागायचा. त्यामुळे हा प्रयोग थांबलेला आहे. आता या विद्यापीठस्तरावर तूर्त तरी नवीन संशोधन सुरू नाही. सीआयसीआरकडून सेन्सर बेस यंत्र संशोधनाचे प्रयोग सुरू आहेत. ते यशस्वी झाले आणि आपल्याला मिळाले, तर त्याचा वापर सुरू करता येईल.
- डॉ. डी. एम. मानकर, संचालक, 
संशोधन तथा शिक्षण विस्तार, पंदेकृवि, अकोला
 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...