कापसाच्या किमतीत वाढीची शक्यता
कापसाच्या किमतीत वाढीची शक्यता

कापसाच्या किमतीत वाढीची शक्यता

गेल्या सप्ताहात किमतींचा आलेख काहीसा घसरता होता. कापूस व मका वगळता इतर पिकांच्या किमती घसरल्या. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.     

अमेरिका व चीन यांच्या संभाव्य व्यापार युद्धामुळे भारताकडून चीनकडे निर्यात वाढवण्याची शक्यता सध्या अजमावली जात आहे. तसे झाले तर सोयाबीन पेंडीची निर्यात वाढण्याचा अंदाज आहे. कापसाच्या निर्यातीतसुद्धा वाढ होईल. सोयाबीन आत्ता स्पॉट मध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला तर २.१ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९५२) मिळेल. गवार बीचे भाव जुलै मध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.१ टक्क्यांनी अधिक (रु. ४,१४०) मिळतील. कापसाचे भाव जुलै मध्ये ४ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,७६०). हरभऱ्याचे भाव जुलै मध्ये ४.५ टक्क्याने अधिक असतील (रु. ३,८५३). मात्र रबी मक्याचे भाव जून मध्ये ९.२ टक्क्यांनी कमी मिळतील (रु. १,१८९). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका रबी मक्याच्या (मे २०१८) किमती २० मार्चपर्यंत वाढत होत्या ( रु.१,१३६ ते रु. १,१८०). नंतर मात्र त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी वाढून रु. १,१८१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,३१० वर स्थिर आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१८९ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९५१ ते रु ३,७२१). या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,८५३ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,८७२ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,९५२ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. पुढील काही दिवस भावात मर्यादित चढउतार होण्याची शक्यता आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च मध्ये प्रथम वाढत रु. ७,१३८ पर्यंत पोहोचल्या; नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी घसरून रु. ६,५२२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,४०७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,६४६). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात्त मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल.

 गहू गव्हाच्या (मे २०१८) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या ( रु. १,७६१ ते रु. १,६९२). या सप्ताहात त्या रु. १,६९० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,६५४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७५४). एप्रिल पासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३६८ ते  रु. ४,१२०). या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ४,०८५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,०५६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१४०). किमती घसरण्याचा संभव आहे.

हरभरा मार्च महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती रु. ३,६१४ ते रु. ३,८१८ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,७५७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,६८८ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ४.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,८५३). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण व राजस्थान येथे शासनाची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात व मध्य प्रदेश मध्येसुद्धा खरेदी सुरू झाली आहे.

साखर

साखरेच्या (मे २०१८) किमती २१ मार्चपासून घसरत आहेत (रु. ३,३६१ ते रु. ३,०२५). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. २,९८१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९६१ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. २,९९९ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती ८ मार्च पासून घसरत होत्या (रु. २१,४३० ते रु. २०,५६०). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. २१,०१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,९६५ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,७६०). किमतीत काही प्रमाणात वाढ शक्य आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com