कापूस दरवाढीने  पाकिस्तानची चिंता वाढली

पाकिस्तानमध्ये लांब धाग्याच्या कापसाचे दर १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपये प्रतिमण (एक मण म्हणजेच ३७.३२४२ किलो) झाले आहेत. स्थानिक बाजारात दर १५ हजार ९०० रुपये प्रतिमणावर पोहोचले आहेत.
Cotton price hike Pakistan's concern increased
Cotton price hike Pakistan's concern increased

पुणे : पाकिस्तानमध्ये लांब धाग्याच्या कापसाचे दर १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपये प्रतिमण (एक मण म्हणजेच ३७.३२४२ किलो) झाले आहेत. स्थानिक बाजारात दर १५ हजार ९०० रुपये प्रतिमणावर पोहोचले आहेत. तर फुटी आणि बलूचिस्तानच्या कापसाचे दर हे ८ हजार २०० रुपये प्रतिमणावर पोहोचले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने देशांतर्गत कापूस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि सरकीवरील १७ टक्के विक्री शुल्क रद्द करावेत, अशी मागणी पाकिस्तानी कापूस गिरणी असोसिएशन आणि पाकिस्तान कापड मिल असोसिएशनने केली आहे.  मागील आठवड्यात सूतगिरण्या खरेदी उतरलेल्या असल्याने दरात वाढीचा कल कायम होता. तर कापड उद्योग मात्र वाढत्या दरामुळे साठा करून ठेवण्यास इच्छुक दिसत नाही. सध्या न्यूयार्क कॉटन एक्स्चेंजवर दरातील चढ-उतारानंतर कापसाचे वायदे १.१८ सेंट प्रतिपाउंडवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसातील तेजी कायम असून, भारतातही दर वाढलेले आहेत. भारतात कापसाचे दर ६७ हजार प्रतिखंडीवर (एक खंडी म्हणजेच ३५६ किलो) आहेत. पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होत असतानाही कापसाचे दर तेजीत आहेत. रुपयाचे अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्यास सूतगिरण्या कापूस आयातीसाठी पुढे येतील.  पाकिस्तानमध्ये कापसाचे उत्पादन घटल्याने देशांतर्गत कापड उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला कापूस आयात करावी लागणार आहे. मात्र दर वाढल्याने उद्योगाने चिंता व्यक्त केली आहे. सरकारने धोरण आखून कापड उद्योगाचा विस्तार केला आहे.

पाकिस्तानातील प्रांतनिहाय दर सिंध प्रांतात कापसाचे दर गुणवत्तेप्रमाणे सरासरी १२ हजार ५०० ते १६ हजार ७०० रुपये प्रतिमण आहेत. फुट्टी कापसाचे दर साडेचार हजार ते सात हजार रुपये प्रति ४० किलो आहेत. तर सरकीचे दर १३५० ते दोन हजार रुपये प्रतिमणावर आहेत. पंजाबमध्ये कापसाचे दर सरासरी १४ हजार ४०० ते १६ हजार ५०० पाकिस्तानी रुपये प्रतिमण आहेत. तर कच्च्या कापसाचे दर ५ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये प्रति ४० किलोवर आहेत. पंजाब प्रांतात सरकीचे दर १५५० ते २१०० रुपये प्रतिमण आहेत. बलुचिस्तान प्रांतात कापसाचे दर सरासरी १३ हजार ७०० ते १६ हजार पाकिस्तानी रुपये प्रतिमणावर आहेत. येथे कच्च्या कापसाचे दर ६ हजार २०० ते ८ हजार २०० रुपये प्रति ४० रुपये आणि सरकीचे दर प्रतिमण १६०० ते २२०० रुपयांवर आहेत

प्रतिक्रिया

कापड उद्योगाचा विस्तार करण्यासाठी साडेचार हजार कोटींची मशिनरी आयात केली आहे. तर यंदा सहा हजार कोटींचे कापड निर्यात केले. सध्या वाढत्या कापूस दराचा फटका उद्योगांना बसत आहे. -गोहर एजाज, अध्यक्ष, ऑल पाकिस्तान टेक्स्टाइल मिल्स असोसिएशन.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सध्या तेजीचा कल आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि आफ्रिकी देशांत कापसाचे दर वाढले आहेत. त्यातच पाकिस्तानातील कापूस उत्पादन घटल्याने कापड उद्योगाला अडचणी येत आहेत. कापूस आयात महागल्याने कापड उद्योगाचा खर्च वाढत आहे.  - नईम उस्मान, अध्यक्ष, कराची कॉटन ब्रोकर फोरम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com