हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात कापूस दरात सुधारणा

हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात कापूस दरात सुधारणा
हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात कापूस दरात सुधारणा

परभणी ः जिल्ह्यात कापूस खरेदी हंगाम अखेरच्या टप्प्यात आलेला असताना कापूस दरात सुधारणा झाली आहे. चांगल्या दर्जाच्या कापसाचे दर साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. खरेदी हंगाम आटोपण्याच्या स्थितीत असताना कापूस दरात झालेल्या वाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक झाल्याचे चित्र आहे.

परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू,  मानवत या कापसाच्या प्रमुख बाजारापेठांमध्ये यंदा कापूस खरेदी हंगामाच्या सुरवातीला कापसाचे प्रतिक्विंटलचे दर ५ हजार रुपयांच्या आत होते. फेब्रुवारीनंतर दरात सुधारणा होत गेली, परंतु दुष्काळी स्थितीमुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आली. आर्थिक गरजा भागविण्यासाठी अल्पभूधारक -मध्यम शेतकऱ्यांना दर पाच हजारांच्या आसपास असताना कापूस विक्री केला.

परंतु अनेक बहुतांश मोठ्या शेतकऱ्यांनी दर सहा हजार रुपये होतील, या अपेक्षेने कापूस घरात साठवून ठेवणे पसंद केले. त्या शेतकऱ्यांचा आता दर सहा हजार रुपयांच्या वर गेल्यामुळे चांगला फायदा झाला आहे. परंतु दरातील सुधारणेचा फायदा खेडा पद्धतीने प्रतिक्विंटल पाच ते साडेपाच हजार रुपये दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अधिक झाल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात परभणी, सेलू, मानवत या कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील कापूस खरेदी हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असताना कापूस दर सहा हजारांचा टप्पा पार करत साडेसहा हजार रुपयांपर्यंत दर पोचले आहेत. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) ७० वाहनांतून कापसाची आवक झाली होती. त्या वेळी प्रतिक्विंटलचे कमाल दर ६ हजार होते. 

मंगळवारी (ता. ३०) १ हजार ६७५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५ हजार ७४५ ते ६ हजार ३९५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २९) १ हजार २०० क्विंटल आवक होती. त्या वेळी ५ हजार ६५० ते ६ हजार ४५० रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीमध्ये आजवर दीड लाख क्विंटल खरेदी झाली आहे. शनिवार (ता. ४) पर्यंत कापूस खरेदी सुरू राहील, असे सांगितले.

मानवतमध्ये प्रतिक्विंटल ६ हजार ४२० रुपये मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ३०) कापसाची २ हजार ५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५ हजार ८०० ते ६ हजार ४२० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २९) कापसाची २ हजार क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटल ५ हजार ७०० ते ६ हजार ४१६ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com