agriculture news in marathi, cotton prices on hurdler mode on openning | Agrowon

नवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवात
मनीष डागा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

देशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची सुरुवात एक ऑक्टोबरपासून झाली आहे. प्रत्येक वर्षी नवीन हंगामाची सुरवात वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध घटकांकडून आशा आणि अपेक्षांनी भरलेल्या वक्तव्यांनी होत असते. पण, यंदा मात्र अशा प्रेरक वक्तव्यांची संख्या अगदीच तुरळक होती. याची काही कारणे आहेत: 

देशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची सुरुवात एक ऑक्टोबरपासून झाली आहे. प्रत्येक वर्षी नवीन हंगामाची सुरवात वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध घटकांकडून आशा आणि अपेक्षांनी भरलेल्या वक्तव्यांनी होत असते. पण, यंदा मात्र अशा प्रेरक वक्तव्यांची संख्या अगदीच तुरळक होती. याची काही कारणे आहेत: 

वातावरणातील बदलाचा प्रतिकूल परिणाम
आज वातावरणातील बदल हा जगासमोरचा एक प्रमुख प्रश्न बनला आहे. वातावरणातील बदलांमुळे जगाला गेल्या वीस वर्षांच्या काळात दोन लाख कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे. भारतालाही गेल्या वीस वर्षांत ८० हजार कोटी डॉलरचा फटका बसला आहे. वातावरणातील बदलांचा सगळ्यात मोठा परिणाम शेती उद्योगावर होतो. याच कारणामुळे गेल्या दोन वर्षांत भारतात कापसाची विक्रमी लागवड होऊनही उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याचे आढळून येते. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक संकटांमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. गेल्या वर्षी देशात १२२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आणि ३६५ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले.  यंदा (२०१८-१९) १२०.६ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा झाला. लागवड चांगली होऊनही यंदा उत्पादनात मात्र घसरण अपेक्षित आहे.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) ने औरंगाबाद येथे झालेल्या परिषदेत २०१८-१९ या हंगामातील संभाव्य कापूस उत्पादनाचे आकडे जाहीर केले. `सीएआय`चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी देशात या हंगामात ३४८ लाख गाठी कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज जाहीर केला. देशातील प्रमुख कापूस उत्पादक क्षेत्रांमधील अवर्षणसदृश परिस्थिती लक्षात घेता कापूस उत्पादनाचा आकडा आणखीनच खाली जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. ३४८ लाख गाठी हा `सीएआय`चा या हंगामातील कापूस उत्पादनाचा पहिला अंदाज आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हवामानाची स्थिती काय राहते, यावर या आकड्यात वाढ किंवा घट होणे अपेक्षित आहे.  भारताप्रमाणेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांसारखे प्रमुख कापूस उत्पादक देश वातावरणातील बदलाची शिकार झालेले आहेत. या सर्व देशांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे, होत आहे. 

 डोनाल्ड ट्रम्प यांची कूटनीती   
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हापासून सत्तासूत्रे हाती घेतली आहेत, तेव्हापासून जगभरातील व्यापारी आणि व्यापाराला `दुःख भरे दिन` आलेले आहेत, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. ट्रम्प यांच्या अल्पकालीन, अविचारी आणि स्वार्थी धोरणांमुळे जगातील अनेक देश त्रस्त आहेत. ट्रम्प यांनी व्यापाऱ्यांच्या आत्मविश्वासालाच जणू मोठा तडा दिला आहे. ट्रम्प यांनी चीन व इतर अनेक देशांशी व्यापारयुद्ध पुकारल्यामुळे अनेक शेतमालाच्या बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात प्रामुख्याने कापसाचा समावेश आहे. 

अमेरिका कापूस वायदेबाजार आयसीई सातत्याने दबावात असल्याचे दिसून येत आहे. भारताच्या कापूस बाजारपेठेवरही या घडामोडींचा विपरीत परिणाम होत आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने घसरण सुरू आहे. परंतु, त्याचा लाभ निर्यातदारांना मिळताना दिसत नाही. भारतीय व्यापारी आणि गिरण्यांना रई, सूत आणि कपडा निर्यात करण्यात अनेक अडथळे आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला खरेदीदार शांत आहेत; तर दुसरीकडे आपण ज्या देशांना निर्यात करतो, त्यांचे चलन डॉलरच्या तुलनेत घसरत असल्याने त्या देशांना आयात महाग पडत आहे. त्यामुळे निर्यातदारांसमोरील अडचणी वाढत आहेत.     

सारांश जगभरातील कापूस बाजारावर वातावरणातील बदल आणि ट्रम्प नीती यांचा खूप मोठा विपरीत प्रभाव पडलेला आहे. देशात रुई बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. हजर बाजारात नवीन गुजरात शंकर-६ वाणाच्या कापसाचे दर ४६ हजार ते ४६ हजार ३०० रुपयांदरम्यान आहे. महाराष्ट्रात बन्नी ४५ हजार ५०० ते ४६ हजार २०० रुपये अशी रेंज आहे. सध्या रोजची आवक ५० हजार गाठींच्या आसपास आहे. उत्तर भारतात रई अजूनही स्वस्तात (४३ हजार ५०० ते ४५ हजार रुपये) उपलब्ध होत असल्याने तिथे मागणी चढी आहे. गिरण्या आणि निर्यातदार या दोन्ही घटकांकडून खरेदी सुरू झाली आहे. दसऱ्यापासून अनेक जिनिंग फॅक्टरी सुरू होतील. गिरण्या खरेदी वाढवतील. 
बाजाराची पुढची चाल आवक आणि निर्यातदारांकडून मालाची खरेदी यावर अवलंबून आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक आणि निर्यादारांचे सौदे यांत जो आघाडीवर राहील त्या अनुषंगाने रुई बाजाराचा कल ठरेल. सध्याचा एकूण रागरंग पाहता आवक आणि खरेदी यात ताळमेळ राहील का, याविषयी शंका वाटते. 

  • कापूस उत्पादनात घट होण्याचे संकेत.
  • गेल्या दोन वर्षांपासून भारतात कापसाला वातावरणातील बदलाचा फटका.
  • अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांसारख्या देशांतही कापसाचे नुकसान.
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारनीतीमुळे कापूस बाजार विस्कळित.
  • अमेरिकी वायदे बाजार दबावात.
  • भारतासह प्रमुख देशांत हजर बाजारातही कापसाच्या दरावर परिणाम.

(लेखक कापूस बाजार विश्लेषक असून `कॉटनगुरू`चे प्रमुख आहेत.)

इतर अॅग्रोमनी
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...