agriculture news in marathi, cotton prices moved up 5500 | Agrowon

कापूस बाजार उसळून ५५०० रुपयांवर
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 31 मे 2018

जळगाव ः दुष्काळ व प्रचंड उष्णता यामुळे अमेरिकेतील (यूएसए) टेक्‍सास प्रांतात कापूस लागवड जवळपास निम्मी घटली आहे. जगाला दरवर्षी २२० लाख गाठींचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकेत तब्बल ६० ते ६२ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यातच पाकिस्तानध्ये लागवड केलेल्या बीटी (बॅसीलस थुरीलेंझीस) वाणांबाबत मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राने शंका उपस्थित केल्याने नवा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी जागतिक कापूस बाजारात मागील पाच दिवसांत मोठी उसळी आली असून, देशांतर्गत बाजारात कापूस दर मंगळवारी (ता. २९) प्रतिक्विंटल ५५०० रुपयांवर पोचला आहे.

जळगाव ः दुष्काळ व प्रचंड उष्णता यामुळे अमेरिकेतील (यूएसए) टेक्‍सास प्रांतात कापूस लागवड जवळपास निम्मी घटली आहे. जगाला दरवर्षी २२० लाख गाठींचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकेत तब्बल ६० ते ६२ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यातच पाकिस्तानध्ये लागवड केलेल्या बीटी (बॅसीलस थुरीलेंझीस) वाणांबाबत मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राने शंका उपस्थित केल्याने नवा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी जागतिक कापूस बाजारात मागील पाच दिवसांत मोठी उसळी आली असून, देशांतर्गत बाजारात कापूस दर मंगळवारी (ता. २९) प्रतिक्विंटल ५५०० रुपयांवर पोचला आहे. यंदा कापसाला मिळणारा हा उच्चांकी दर ठरला आहे. 

देशात जसा महाराष्ट्र कापूस लागवडीत आघाडीवर आहे. तसा अमेरिकेत टेक्‍सास प्रांत कापूस लागवडीत पुढे असून, या भागात मार्च ते मे दरम्यान लागवड केली जाते. अमेरिकेत एकूण ३८ लाख ४८ हजार हेक्‍टवरवर लागवड केली जाते. त्यांची उत्पादकता हेक्‍टरी ९७२ किलो रुई प्रतिहेक्‍टरी एवढी आहे. दरवर्षी किमान २२० ते २२३ लाख गाठींचे उत्पादन अमेरिका करतो. परंतु तेथे दुष्काळी व उष्णतेची स्थिती आहे. उष्णतेमुळे कापूस लागवड घटली आहे.

अमेरिकेत ऑगस्ट ते डिसेंबर यादरम्यान रुई उपलब्ध होते. परंतु यंदा तेथे वेळेत व अपेक्षित प्रमाणात कापूस किंवा रुई मिळणार नाही. सुमारे ३३ टक्के उत्पादन तेथे घटेल. अर्थातच अमेरिका जागतिक बाजारात सुमारे ६० ते ६२ लाख गाठींचा पुरवठा कमी करील. जेवढे उत्पादन अमेरिका करतो, त्याची अधिकाधिक निर्यात तेथून केली जाते. तेथील उत्पादन घटेल, असे वृत्त जागतिक कापूस बाजारात आल्याने न्यूयॉर्क ट्रेड इंटेक्‍सने उसळी घेतली असून, सर्व देशांच्या कापसाचे दर वधारले आहेत.

भारतीय कापसाचे किंवा रुईचे दर सोमवारी ४२५०० रुपये प्रतिखंडी (३५६ किलो रुई) असे होते. ते मंगळवारी (ता. २९) ४४५०० रुपये झाले आहेत. न्यूयॉर्क ट्रेड इंडेक्‍स प्रतिपाऊंड चार सेंटने वधारला आहे. देशांतर्गत बाजारात दर्जेदार कापसाचे दर प्रतिक्विंटल ५५०० रुपये किमान असे झाले आहे. अर्थातच केवळ एका दिवसात कापसाच्या दरात क्विंटलमागे सुमारे ३५० रुपये वाढ झाली आहे. 

पाकिस्तानातही गोंधळ
जगात पाकिस्तानमधील कापूस उत्पादनही जागतिक बाजारात रुईच्या पुरवठ्यासंबंधी महत्त्वाचे मानले जाते. तेथे दरवर्षी किमान ११८ लाख गाठींचे उत्पादन घेतले जाते. तेथे मार्च ते जुलै या दरम्यान कापूस लागवड केली जाते. कापूस लागवडीत तेथे सिंध, पंजाब हा भाग आघाडीवर आहे. या भागात लागवड बऱ्यापैकी झाली आहे. परंतु अलीकडेच मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन संस्थेने एका खासगी व आघाडीच्या कंपनीने जे बीटीचे तंत्रज्ञान पाकिस्तानला दिले, त्या तंत्रज्ञानावर शंका उपस्थित केली आहे. संबंधित तंत्रज्ञान बीटीचे नसल्याचे मुलतान येथील संशोधन संस्थेने किंवा केंद्राने म्हटले असून, या वृत्ताचाही कापूस बाजारावर परिणाम होऊन नवा गोंधळ निर्माण झाला आहे. तेथे हवे तसे उत्पादन येईल की नाही, असे प्रश्‍न तेथे उपस्थित होत आहेत. 
 

इतर अॅग्रो विशेष
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घटनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
भारताची चंद्राला पुन्हा गवसणी;...श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...