Agriculture news in Marathi Cotton prices remain stable in Pakistan | Agrowon

पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकून

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 डिसेंबर 2021

पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ झाली असली, तरी येथील उद्योगाची गरज भागविण्यासाठी हे उत्पादन कमीच पडणार आहे. त्यामुळे यंदा उत्पादनाऐवढीच म्हणजेच ७५ लाख गाठी (१७० किलो) कापसाची आयात होणार आहे.

पुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ झाली असली, तरी येथील उद्योगाची गरज भागविण्यासाठी हे उत्पादन कमीच पडणार आहे. त्यामुळे यंदा उत्पादनाऐवढीच म्हणजेच ७५ लाख गाठी (१७० किलो) कापसाची आयात होणार आहे. सध्या येथे रुईचे दर १३ हजार ५०० ते १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपये प्रति मणावर (एक मण म्हणजेच ३७.३२ किलो रुई) आहेत. तर कच्च्या कापसाचे दर ४ हजार ५०० ते ८ हजार ४०० रुपये प्रति ४० किलोवर आहेत. 

पाकिस्तानमध्ये यंदा ७५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. तर ७५ लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यता आहे. येथील आयातदारांनी आतापर्यंत ४५ लाख गाठी कापूस आयातीचे करारही केले आहेत. पाकिस्तानचा विचार करता कापूस रुईचे दर १३ हजार ५०० ते १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपये प्रतिमण आहेत. तर हजर बाजारात रुई प्रतिमण १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपयांवर टिकून आहे. तर कच्या कापसाचे भाव ५ हजार ४०० ते ७ हजार २०० रुपये प्रति ४० किलो आहेत. 

पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकून असून, कापसाचा व्यापार मात्र कमी होत आहे, असे येथील व्यापारी एजन्सीने सांगितले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रुईचे दर १५ हजार ते १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपयांवर स्थिर आहेत. तर कच्या कापसाचे दर प्रति ४० किलोसाठी ५ हजार ४०० ते ७ हजार २०० रुपयांवर आहेत. सिंध प्रांतात कच्च्या कापसाचे दर ४ हजार ५०० ते ६ हजार ८०० पाकिस्तानी रुपयांवर आहेत. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये रुईचे भाव १५ हजार ५०० ते १६ हजार ५०० रुपये प्रतिमण आणि कच्च्या कापसाचे भाव ६ हजार २०० ते ८ हजार ४०० रुपये प्रति ४० किलोवर आहेत.

सरकीही खातेय भाव
पाकिस्तानमध्ये कापसाबरोबरच सरकीही भाव खात आहे. येथील पशुधन खाद्यात सरकी पेंडेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून सरकी पेंडीला जास्त मागणी असते. सध्या पाकिस्तानमध्ये सरकीचे दर १ हजार ३५० रुपये ते २ हजार १०० रुपये प्रतिमणावर आहेत. तर पंजाबमध्ये सरकीचे दर १ हजार ६०० रुपये ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे.

यंदा पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादन वाढीची शक्यता आहे. तर आयातही ७५ लाख गाठींवर होईल, असा अंदाज आहे. आयातदारांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ४५ लाख गाठी कापूस आयातीसाठीचे करार झाले आहेत.
- नईम उस्मान, कापूस व्यापारी, कराची


इतर अॅग्रो विशेष
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...