agriculture news in marathi Cotton prices rises in local direct purchase in Khandesh region | Page 2 ||| Agrowon

खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

जळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खेडा (थेट) खरेदी सुरू आहे. दरात दिवाळीनंतर चांगली सुधारणा झाली आहे.

जळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खेडा (थेट) खरेदी सुरू आहे. दरात दिवाळीनंतर चांगली सुधारणा झाली आहे.

खानदेशात जिनींग प्रेसिंग कारखाने दिवाळीनंतर वेगात सुरू झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ५५ कारखाने कापसावर प्रक्रिया करीत आहेत. दिवाळी काळातही कारखाने वेगात सुरू होते. राज्यात इतरत्र पाऊस झाला, पण जळगाव, धुळे भागात कोरडे व निरभ्र वातावरण असल्याने कापूस प्रक्रियेत अडथळा आला नाही. यामुळे खेडा खरेदीदेखील सुरू आहे.

सप्टेंबरमध्ये सुरवातीला ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. त्यात मोठी वाढ गेल्या दोन महिन्यात झाली आहे. पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा आदी भागात कापसाची खेडा खरेदी ८६०० ते ९२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात झाली आहे. हा या हंगामातील कापसाला खेडा खरेदीत मिळालेला उच्चांकी दर आहे.

कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील मोठ्या खरेदीदारांचे एजंट खानदेशात कार्यरत आहेत. खरेदीला पुन्हा एकदा वेग आल्याने रोज मोठी उलाढाल होत आहे. सध्या रोज एक लाख क्विंटल कापसाची आवक खानदेशात (नंदुरबार वगळता) होत आहे. दरवाढीमुळे आवकही वाढेल. कारण अनेक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये दराची प्रतीक्षा होती.

यातच कापूस उत्पादनातील घटीमुळे खानदेशात गाठींचे उत्पादनही गेल्या वर्षापेक्षा दोन ते अडीच लाख गाठींनी कमी होईल, असे सांगितले जात आहे. यामुळेदेखील कापसाची पळवापळवी सुरू असल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया...
खानदेशात सध्या रोज एक लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक होत आहे. गुजरात, मध्य प्रदेशातूनही मागणी आहे. शिवाय खानदेशातील कारखानदारांकडूनही गाठींचा मोठा पुरवठा सूतगिरण्यांसह परदेशात केला जात आहे. कापसाचा तुटवडा जाणवत असल्याने दरवाढ सुरूच आहेत. पुढेही दर टिकून राहतील.
- अरविंद जैन, सदस्य,
कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती) 


इतर अॅग्रोमनी
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...