कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढली
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढली

कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढली

जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला.   खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदीदेखील सुरू आहे. सीसीआयने सुमारे ८० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. तर पणन महासंघातर्फेदेखील खरेदी बऱ्यापैकी झाली आहे.   सीसीआयचे जळगाव, भुसावळ, जामनेर, शेंदूर्णी (ता. जामनेर), पाचोरा, शहादा (ता. नंदुरबार), शिरपूर (जि. धुळे) तर महासंघाचे केंद्र भडगाव, धरणगाव, अमळनेर व मालेगाव (जि. नाशिक) येथे सुरू आहेत. सीसीआय व महासंघाच्या केंद्रात १२ टक्‍क्‍यांच्या आर्द्रतेच्या कापसाला ५२०० रुपयांवर दर मिळत आहे. तर १५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आर्द्रतेच्या कापसाला पाच हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. या केंद्रात शेतकरी व किरकोळ व्यापारी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. शासकीय खरेदी वेगात सुरू असल्याने खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर मागील २० ते २५ दिवसांपासून स्थिर आहेत. गुजरातमधील कारखानदारांकडूनही खेडा खरेदीला वेग देण्यात आला आहे. रावेर, यावल व चोपडा भागांतून मध्य प्रदेशातील एजंट कापूस खरेदी करीत आहे. एकाच शेतकऱ्याकडे ६० ते ७० क्विंटल कापूस असल्यास त्यांना खेडा खरेदीत ५१०० रुपयांचा दर मिळत आहे. तर १० ते २० क्विंटल कापूस विक्रीसंबंधी खेडा खरेदीमध्ये ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीदार देत आहेत.  खानदेशात सुमारे ९१ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये खरेदी सुरू असून, काही कारखानदार कापसाची खेडा खरेदी एजंटच्या माध्यमातून करून घेत आहेत. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार भागात गुजरात, मध्य प्रदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखानदारांचे एजंट कापसाची खरेदी करीत आहेत. मागील १० ते १५ दिवसांपासून वातावरण बऱ्यापैकी कोरडे व निरभ्र राहिल्याने शेतात कापसाचा दर्जा चांगला आहे. या दर्जेदार कापसालादेखील चांगले दर खेडा खरेदीत पुढे मिळू शकतात. कापसाखालील क्षेत्र झपाट्याने रिकामे झाल्याने कापसाचा तुटवडा काही जिनिंग कारखान्यांना भासू शकतो. जिनिंग प्रेसिंग कारखान्यांप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी (उंटावद होळ, ता. शहादा) व धुळे तालुक्‍यातील जवाहर सहकारी सूतगिरणीतही कापसाची खरेदी सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com