Agriculture news in marathi Cotton prices rose steadily, buying up rs. 5100 | Agrowon

कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला.
 
खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदीदेखील सुरू आहे. सीसीआयने सुमारे ८० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. तर पणन महासंघातर्फेदेखील खरेदी बऱ्यापैकी झाली आहे.  

जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला.
 
खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदीदेखील सुरू आहे. सीसीआयने सुमारे ८० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. तर पणन महासंघातर्फेदेखील खरेदी बऱ्यापैकी झाली आहे.  

सीसीआयचे जळगाव, भुसावळ, जामनेर, शेंदूर्णी (ता. जामनेर), पाचोरा, शहादा (ता. नंदुरबार), शिरपूर (जि. धुळे) तर महासंघाचे केंद्र भडगाव, धरणगाव, अमळनेर व मालेगाव (जि. नाशिक) येथे सुरू आहेत. सीसीआय व महासंघाच्या केंद्रात १२ टक्‍क्‍यांच्या आर्द्रतेच्या कापसाला ५२०० रुपयांवर दर मिळत आहे. तर १५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आर्द्रतेच्या कापसाला पाच हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. या केंद्रात शेतकरी व किरकोळ व्यापारी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. शासकीय खरेदी वेगात सुरू असल्याने खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर मागील २० ते २५ दिवसांपासून स्थिर आहेत.

गुजरातमधील कारखानदारांकडूनही खेडा खरेदीला वेग देण्यात आला आहे. रावेर, यावल व चोपडा भागांतून मध्य प्रदेशातील एजंट कापूस खरेदी करीत आहे. एकाच शेतकऱ्याकडे ६० ते ७० क्विंटल कापूस असल्यास त्यांना खेडा खरेदीत ५१०० रुपयांचा दर मिळत आहे. तर १० ते २० क्विंटल कापूस विक्रीसंबंधी खेडा खरेदीमध्ये ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीदार देत आहेत. 

खानदेशात सुमारे ९१ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये खरेदी सुरू असून, काही कारखानदार कापसाची खेडा खरेदी एजंटच्या माध्यमातून करून घेत आहेत. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार भागात गुजरात, मध्य प्रदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखानदारांचे एजंट कापसाची खरेदी करीत आहेत. मागील १० ते १५ दिवसांपासून वातावरण बऱ्यापैकी कोरडे व निरभ्र राहिल्याने शेतात कापसाचा दर्जा चांगला आहे. या दर्जेदार कापसालादेखील चांगले दर खेडा खरेदीत पुढे मिळू शकतात. कापसाखालील क्षेत्र झपाट्याने रिकामे झाल्याने कापसाचा तुटवडा काही जिनिंग कारखान्यांना भासू शकतो. जिनिंग प्रेसिंग कारखान्यांप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी (उंटावद होळ, ता. शहादा) व धुळे तालुक्‍यातील जवाहर सहकारी सूतगिरणीतही कापसाची खरेदी सुरू आहे. 


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२५...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात कांदा २०० ते २५०० रुपये क्विंटललासलगावात १००० ते २२११ रुपये दर नाशिक :...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...