राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीच

राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीच
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीच

जळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी म्हणजेच ५५५० व ५४५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमीच आहेत. खानदेश, विदर्भ व मराठवाड्यात पूर्वहंगामी कापसात आर्द्रता २५ ते ३० टक्के येत आहे. अधिक आर्द्रतेमुळे दर दबावात असल्याची माहिती मिळाली.  कोरडवाहू कापसात अजून वेचणी अपवाद वगळता फारशी सुरू झालेली नाही. पूर्वहंगामी (जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड) कापसात वातावरण कोरडे होताच वेचणीने वेग घेतला आहे. यातच थंड वातावरण तयार होत असल्याने बोंडे उमलण्याची प्रक्रिया काहीशी मंदावली आहे. काळ्या कसदार जमिनीत बोंडे उमलण्याची प्रक्रिया अधिकची मंद झाली आहे. शासकीय कापूस खरेदीबाबत सर्वत्र प्रतीक्षा आहे.  खानदेश, पश्‍चिम विदर्भ व मराठवाड्यातील औरंगाबादपर्यंत कापसाची खेडा खरेदी सुरू झाली आहे. गुजरातमधील खरेदीदार या भागात येत आहेत. तर मराठवाडा, विदर्भातील यवतमाळ व लगतच्या भागातून आंध्र प्रदेशातील मोठे खरेदीदार एजंटच्या माध्यमातून कापूस खरेदी करीत आहेत. ही खरेदी अजून फारशी सुरू नाही. पण, खेडा खरेदीत दर्जेदार किंवा कमी आर्द्रतेचा कापसाला कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. तर अधिक आर्द्रता किंवा कमी दर्जाच्या कापसाला ४३०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे.  खानदेश, पश्‍चिम विदर्भासह खानदेशलगत गुजरात, मध्य प्रदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखाने या आठवड्यात सुरू झाले आहेत. या कारखान्यांतर्फेदेखील कापसाची खेडा खरेदी सुरू आहे. मध्य प्रदेशातील सेंधवा, खरगोन, बऱ्हाणपूर, बडवानी आदी भागांतील बाजार व जिनिंग प्रेसिंग कारखान्यात मागील आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल कमाल ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  राज्यात कापसाची आवक कमी असली तरी दरात फारशी वाढ झालेली नाही. सरकीच्या दरांवर आर्द्रता व कमी उचल यामुळे दबाव वाढल्याने दरवाढ थांबली आहे. परंतु, दर स्थिर आहेत. खानदेश, पश्‍चिम विदर्भ व मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना भागांतील खासगी बाजार, जिनिंग व इतर राज्यांतील खरेदीदारांच्या एजंटकडे मिळून सुमारे १२ ते १३ लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची आवक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com